पीककर्ज वाटपात बँकांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:50 AM2018-06-20T00:50:39+5:302018-06-20T00:50:39+5:30

पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़

Peak Coverage Banks Dump | पीककर्ज वाटपात बँकांचा खोडा

पीककर्ज वाटपात बँकांचा खोडा

Next
ठळक मुद्देचार बँकांना उद्दिष्ट ७१़७९ कोटींचे; वाटप शून्य : आजपर्यंत केवळ सहा टक्केच वाटप

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़
दिवसेंदिवस शेतीच्या उत्पन्नात होणारी घट आणि नैसर्गिक आपत्तीने अडचणीत आलेल्या बहुतांश शेतकºयांना पेरणीच्या काळात पैशाची निकड भासते़ परिणामी शेतकºयांना उसनवारी तसेच सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही़ सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही शेतकºयांच्या गळ्याचा फास बनत चालली होती़ ही बाब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीककर्ज सुरू केले़ खरीप आणि रबीच्या पेरणी काळात बँकाना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देणे आणि बँकाच्या माध्यमातून मागेल त्या शेतकºयांना पीककर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे जीव वाचले़ परंतु, मागील दोन वर्षांपासून पीककर्जाकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ यास बँकांचे धोरण आणि अधिकाºयांची उदासीनता कारणीभूत आहे़ दलालामार्फत दहा ते वीस हजार रूपये देणाºया शेतकºयांनाच कर्ज मिळत आहे़ तर सरळ मार्गाने बँकेत जाणाºया बहुतांश शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे़
दरम्यान, खरीप पीककर्ज जुलैअखेरपर्यंत वाटप होणे गरजेचे आहे़ मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३९४ शेतकºयांना केवळ १३९़६७ कोटी रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये अनेक बँकांनी एकाही शेतकºयांना कर्ज दिले नाही तर बहुतांश बँकांनी बोटावर मोजण्याइतपत शेतकºयांना पीककर्ज दिले आहे़ जिल्ह्यातील जवळपास २९ बँकांना १६८३ कोटी ४७ लाख रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ १३९़६७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे़
---
१५ बँकांकडून १०० पेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटप
पीककर्जाचे उद्दिष्ट दिलेल्या २९ पैकी बँक आॅफ बडोदा, ओरीएंन्टल बँक आॅफ कॉमर्स, युनियन बँक आॅफ इंडिया आणि एयु स्मॉल फायनान्स बँक या चार बँकांनी एकाही शेतकºयांना पीककर्ज दिले नाही़ तर शंभरपेक्षा कमी शेतकºयांना कर्ज देणाºया १५ बँका आहेत़ यामध्ये अलाहाबाद बँकेला ८ कोटी ६९ लाखाचे उद्दिष्ट असताना केवळ १५ शेतकºयांना २० लाख रूपयांचे वाटप केले आहे़ आंध्र बँक (उद्दिष्ट १६ कोटी ७६ लाख) ४१ शेतकºयांना ४५ लाख,कॅनरा बँकेने (१६.३३ कोटी) ६० शेतकºयांना ६१ लाखांचे वाटप, कार्पोरेशन बँक (८.७५ कोटी) २० शेतकºयांना २५ लाख, आयडीबीआय बँक (५१.५७ कोटी) ४० शेतकºयांना ४४ लाख, इंडियन ओव्हरसिज बँक (६.३० कोटी) २२ शेतकºयांना ३४ लाख, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक (७.७२ कोटी) १४ शेतकºयांना १९ लाख, पंजाब नॅशनल बँक (२३.७८ कोटी) ३२ शेतकºयांना ५४ लाख, सिंडीकेट बँक (५.६७ कोटी) ३० शेतकºयांना ३८ लाख, इको (२.०६ कोटी) ३३ शेतकºयांना ५४ लाख, विजया बँक (७.७२ कोटी) २२ शेतकºयांना ४६ लाख, कोटक महिंद्रा बँक (८.२९ कोटी) ५० शेतकºयांना ५५ लाख, कर्नाटका बँक (१.०८ कोटी) १० शेतकºयांना १५ लाख, करूर वैश्य बँक (१.३१ कोटी) १२ शेतकºयांना १० लाख, डीसीबी बँक (१.२५ कोटी) ९७ शेतकºयांना २ कोटी ४५ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.
---
बँकनिहाय असे झाले पीककर्जाचे वाटप
त्याचबरोबर बँक आॅफ इंडियाने (७७.३६ कोटी) १३२ शेतकºयांना १ कोटी ३३ लाख, बँक आॅफ महाराष्टÑ (८६.६१ कोटी) ७०० शेतकºयांना ५ कोटी दोन लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया (३१.९८ कोटी) १६३ शेतकºयांना १ कोटी २४ लाख, देना बँक (१०२.६५ कोटी) १९६ शेतकºयांना २ कोटी ५३ लाख, एसबीआय (६९०.२० कोटी) ४ हजार ११७ शेतकºयांना ३४ कोटी ३० लाख, अ‍ॅक्सिस बँक (२८.८६ कोटी) ११९ शेतकºयांना ८ कोटी ७७ लाख, एचडीएफसी बँक (२३.१४ कोटी) ३९८ शेतकºयांना १० कोटी ९० लाख, आयसीआयसीआय बँक (१३.६० कोटी) २०८ शेतकºयांना २ कोटी ६७ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँक (२३७.१६ कोटी) ४ हजार ५०१ शेतकºयांना ३२ कोटी ७२ लाख तर क्रॉप बँक व मध्यवर्ती बँकेच्या वतीने (१५२.८२ कोटी) १४ हजार ३६२ शेतकºयांना ३२ कोटी ५४ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

Web Title: Peak Coverage Banks Dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.