नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:44 AM2019-06-01T00:44:49+5:302019-06-01T00:48:06+5:30

पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़

Only one and a half percent of crop distribution in Nanded district | नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

Next
ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांची उदासिनता पेरणीपूर्व पीककर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना ठरेल लाभदायी

श्रीनिवास भोसले।
नांदेड : पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ परंतु, शेतक-यांकडे बँक अधिका-यांचा पाहण्याचा दृष्टीकोण आणि उदासिनतेमुळे उद्दिष्ट देवूनही शेतक-यांना कर्ज मिळत नाही़ यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत केवळ १़६३ टक्केच कर्जवाटप झाले आहे़
शासनाच्यावतीने शेतक-यांना खरीप, रबी हंगामात पेरणीसाठी लागणारे खत-बी बियाणे खरेदीसाठी पीककर्ज उपबल्ध करून दिले जाते़ परंतू, नांदेड जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गरज असतांनादेखील शेतकºयांना कर्ज मिळत नाही़ गतवर्षी जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बँकानी कर्जवाटपाची गती वाढविली होती़ परंतु, पेरणी करण्यापूर्वीच पीककर्ज उपलब्ध झाले तर त्यांचा शेतक-यांना योग्य फायदा होतो़ परंतु, बँकाच्या दिरंगाईचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो़ बँकाकडे अर्ज करून तसेच बँक अधिका-यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनदेखील कर्जासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागतात़ ही परिस्थिती बदलली आणि बँकामधील एजंटांवर अंंकुश मिळविण्यात प्रशासनास यश आले तरच सर्वसामान्य शेतक-यांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होवू शकते़
नांदेड जिल्ह्याला यंदाच्या २०१९ - २० खरीप हंगामासाठी १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार रूपये पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक १५११ कोटी ७३ लाख ७४ हजार रूपये उद्दिष्ट व्यापारी आणि खासगी बँकांना दिले आहे़ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १७८ कोटी ६० लाख ४० हजार रूपये तर ग्रामीण बँकेस २७७ कोटी १६ लाख ८३ हजार रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये पीककर्ज २ हजार ६३८ शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे़ त्याची टक्केवारी ६़३४ एवढी आहे़
आजपर्यंत साडेचार हजार शेतक-यांना लाभ
जिल्ह्यातील बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट असूनही पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याचे पहाला मिळत आहे़ आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५८३ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३८ शेतकरी सभासद हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत़ तर १ हजार ९७ शेतक-यांना व्यापारी आणि खासगी बँकानी आणि ग्रामीण बँकेने ८४८ शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे़ खासगी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत़
पीककर्ज हे पेरणीसाठी दिले जाते़ त्यामुळे पीककर्ज वाटप १५ जूनपर्यंत पूर्ण करायला हवे़ परंतु, बँकाकडून दिरंगाई केली जाते़ त्यामुळे पेरणी काळात शेतक-यांना सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे़

Web Title: Only one and a half percent of crop distribution in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.