नांदेडचा गुरुद्वारा बोर्ड दिल्लीत करणार लंगर; शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज केले धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 03:52 PM2020-12-07T15:52:18+5:302020-12-07T15:55:13+5:30

लंगर सामुग्री घेवून ५० जणांची टिम मंगळवारी बोर्डाचे सचिव स.रविंद्रसिंघजी बुंगई यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे रवाना होणार आहे.

Nanded's Gurudwara Board to start Langar in Delhi; Dharane agitation done today in support of farmers | नांदेडचा गुरुद्वारा बोर्ड दिल्लीत करणार लंगर; शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज केले धरणे आंदोलन

नांदेडचा गुरुद्वारा बोर्ड दिल्लीत करणार लंगर; शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज केले धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डाने पाठिंबा जाहीरदिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करणार

नांदेड- केंद्राच्या कृषी धोरणाविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी नांदेड येथेही धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान दिल्लीतील आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डानेही पाठिंबा जाहीर केला असून दिल्लीच्या लंगरसाठी मंगळवारी गुरुद्वारा बोर्डाची ५० जणांची टीम दिल्लीला रवाना होणार आहे. 

समूह हजूरी साथ संगत श्री हुजूर साहिब नांदेड व जिल्ह्यातील नागरिक शेतकऱ्यांच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. नांदेडची धरती ही श्री. गुरुगोविंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. या भूमीतून दिल्लीतील आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करुन देशात समृद्धी व स्थिरता आणावी असे आवाहन संत बाबा बलविंदरसिंघजी यांनी यावेळी केले. आंदोलनाच्या प्रारंभी गुरुद्वारामध्ये अरदास करण्यात आली. त्यानंतर शीख बांधवासह शेतकरी, नागरिकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत नाम वाहे गुरुंचा पाठ करुन शबद गायन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर मोहिनी येवनकर, सुखविंदरसिंघ हुंदल, राजेंद्रसिंघ पुजारी, बोर्डाचे सदस्य गुरमीतसिंघ महाजन, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, विरेंद्रसिंघ गाडीवाले, गुरमितसिंघ नवाब, भागेंदरसिंघ घडीसाज, रविंद्रसिंघ मोदी, अवतारसिंघ पहरेदार, सुरेंद्रसिंघ, प्रकाशकौर खालसा आदींची उपस्थिती होती.

गुरुद्वारा बोर्ड दिल्ली येथे सुरु करणार लंगर
केंद्राच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्डाने पाठिंबा जाहीर केला असून दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी लंगर सामुग्री घेवून ५० जणांची टिम मंगळवारी बोर्डाचे सचिव स.रविंद्रसिंघजी बुंगई यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे रवाना होणार आहे.

Web Title: Nanded's Gurudwara Board to start Langar in Delhi; Dharane agitation done today in support of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.