नांदेडमध्ये युुवा शेतक-याची आत्महत्या, यापूर्वी दोन भावांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:16 AM2017-11-03T01:16:47+5:302017-11-03T01:17:03+5:30

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील पांगरी येथील एका युवा शेतक-याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी त्याच्या दोन भावांनी आत्महत्या केली आहे.

In Nanded, the suicide of Yuva farmer, the suicide of two brothers before this | नांदेडमध्ये युुवा शेतक-याची आत्महत्या, यापूर्वी दोन भावांची आत्महत्या

नांदेडमध्ये युुवा शेतक-याची आत्महत्या, यापूर्वी दोन भावांची आत्महत्या

Next

लोहा (जि.नांदेड) : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील पांगरी येथील एका युवा शेतक-याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी त्याच्या दोन भावांनी आत्महत्या केली आहे.
मोतीराम बुद्रुक (१८) असे या शेतक-याचे नाव असून तुकाराम बुद्रुक (६५) यांच्या चार मुलांपैकी हा धाकटा मुलगा होता. मोतीरामने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. यापूर्वी मोतीरामचे मोठे भाऊ मुंजाजी (२२) यांनी २०११मध्ये तर, अंगद (२३) यांनी २०१५मध्ये गळफास घेऊन मरणाला जवळ केले होते.
अंगद याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे तर मोतीराम अविाहित होता. तुकाराम बुद्रुक यांच्याकडे २५ एकर शेतजमीन आहे. त्यांच्यावर मराठवाडा ग्रामीण बँकेचे ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे.

Web Title: In Nanded, the suicide of Yuva farmer, the suicide of two brothers before this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी