नांदेडात कॉफी शॉपच्या नावाखालील गैरप्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 05:40 PM2018-09-15T17:40:11+5:302018-09-15T17:41:55+5:30

पावडेवाडी येथे कॉफी शॉपच्या नावाखाली जोडप्यांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले.

In Nanded, expose the malpractices under the name of the coffee shop | नांदेडात कॉफी शॉपच्या नावाखालील गैरप्रकार उघडकीस

नांदेडात कॉफी शॉपच्या नावाखालील गैरप्रकार उघडकीस

Next

नांदेड - शहरापासून जवळ असलेल्या पावडेवाडी येथे कॉफी शॉपच्या नावाखाली जोडप्यांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी मारलेल्या धाडीत उघडकीस आले. या प्रकरणी ग्रामस्थांनी ३ जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

मागील काही दिवसांपासून पावडेवाडी ग्राम पंचायत हद्दीत कॉफी शॉप्सना पेव फूटले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 32 कॉफी शॉप उघडले आहेत. मात्र येथे कॉफी शॉपच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यानंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कॉफी शॉपवर धाडी टाकून येथे होत असलेले  गैरप्रकार उघडकीस आणले. सुरु असलेल्या १५ कॉफी शॉपचे व्यवसाय परवाने काही दिवसांपूर्वी रद्द केल्यानंतरही सुरु होते. 

येथे कित्येक दिवस कॉफीच नाही बनली 
सरपंच आणि ग्रामस्थांनी येथे पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. शॉपमध्ये अंधाऱ्या खोल्यांमध्ये मोठे सोफे टाकून बसण्याची व्यवस्था आढळुन आली. तसेच स्वतंत्र कॅबिनमध्ये सोफ्यांची व्यवस्था होती. विशेष म्हणजे येथे गेल्या कित्येक महिन्यापासून कॉफीच बनविण्यात आली नाही. कॉफीचे सारे साहित्य वापरात नसल्याचे दिसून आले. यासोबतच काही आक्षेपार्ह वस्तूही येथे आढळून आल्या. यावेळी शॉपमध्ये असलेल्या ३ जोडप्यांना ग्रामस्थांनी पोलीसांच्या स्वाधीन केले. 

Web Title: In Nanded, expose the malpractices under the name of the coffee shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.