नांदेड जिल्ह्यात अपघातांचे दुष्टचक्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:26 AM2018-04-26T00:26:54+5:302018-04-26T00:26:54+5:30

गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.

Nanded district threw the evil wheel of the accident | नांदेड जिल्ह्यात अपघातांचे दुष्टचक्र थांबेना

नांदेड जिल्ह्यात अपघातांचे दुष्टचक्र थांबेना

Next
ठळक मुद्देदीड वर्षांत ९७२ अपघात : ३९१ जणांना गमवावा लागला जीव; ५९७ गंभीर

गोविंद सरदेशपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.
देशासह राज्यात घडणाऱ्या अपघातांच्या घटनांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेकवेळा रस्त्यांवरील वाहनांचा वेग यासह वाहनचालकांनी केलेल्या चुकांमुळे हे अपघात घडत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जानेवारी २०१७ ते मार्च १८ या दीड वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या एकूण ९७२ घडल्या असून यामध्ये एकूण ३९१ जण दगावले आहेत. अपघात होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये ५५ अपघात झाले. यामध्ये २५ जण दगावले. तर फेबु्रवारीमध्ये ४९ अपघातात २०, मार्चमध्ये ७२ अपघात झाले. ज्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एप्रिल महिन्यातील ६५ अपघातांत ३०, मे महिन्यात ७५ अपघातांच्या घटनांत ३८, जून महिन्यात ७४ अपघात झाले. यात २७ जण दगावले. जुलै महिन्यात ७२ अपघात झाले. त्यात २० जण दगावले. तसेच आॅगस्ट महिन्यात ७१ अपघात झाले असून यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ६० अपघातांत २२ तर आॅक्टोबर महिन्यात २३ जण दगावले. नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांत ३०, डिसेंबर महिन्यात ६७ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. तर सन २०१८ मधील जानेवारी महिन्यातील ६४ अपघातांत २३, फेबु्रवारीमध्ये ५८ अपघातांत २१ तर मार्च महिन्यात झालेल्या ६६ अपघातांमध्ये २९ जण दगावले तर ५९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात ४९ ब्लॅक स्पॉट आहेत़ या सर्व ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीने पट्टे ओढणे, फलक लावणे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असते़ परंतु त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते़
अपघातांच्या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये आणखी जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालविल्यास निश्चितच अपघाताच्या घटनांत घट होण्यास मदत मिळणार आहे.

दुचाकीस्वारांनी अशी काळजी घ्यावी
दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये, नेहमी हेल्मेटचा वापर करावा, दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूनेच करावे, लहान मुलांना वाहनाच्या टाकीवर बसवू नका, वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगा, वाहन धोकादायक पद्धतीने किंवा वेडेवाकडे चालवून पुढे घुसण्याचा प्रयत्न करू नका, दुचाकीची वेग मर्यादा ताशी ५० किमी. असून त्याचे पालन करा.

जड वाहनांसाठीचे नियम
चालक व वाहनात बसणाºया इतर व्यक्तींनी सीट बेल्टचा वापर करावा, वाहनात माल भरताना योग्य बांधणी करावी, मालाच्या आकाराप्रमाणे वाहनाची निवड करावी, प्रखर किंवा रंगीत दिव्यांचा वापर करू नका, तसेच डिप्परचा वापर करा, रस्त्यावरील आखलेल्या पट्ट्यांचा अर्थ जाणून घ्या व त्याप्रमाणे त्याचे पालन करा, आवश्यकता असेल तरच हॉर्नचा उपयोग करा, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवावा, इंधनाची व वंगणाची पातळी तपासावी़

रस्ता सुरक्षा समित्या नावालाच
रस्ता सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळ, पोलिस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांचा समावेश असलेली रस्ता सुरक्षा समिती असते़ या समितीकडून नियमितपणे अपघात प्रवण स्थळे, कारवाई याचा आढावा घेण्यात येतो़ परंतु वाढत्या अपघातांच्या घटनांबद्दल समितीकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ त्यामुळे सध्या तरी ही समिती नावालाच आहे़

Web Title: Nanded district threw the evil wheel of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.