नांदेड जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:54 AM2018-04-07T00:54:16+5:302018-04-07T00:54:16+5:30

जि. प. च्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करावे, असा ठराव शुक्रवारी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

Nanded district Par. Education Officer's resolution | नांदेड जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीचा ठराव

नांदेड जि. प. शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीचा ठराव

googlenewsNext
ठळक मुद्देजि़ प़ : अहवालानंतरच कार्यमुक्त करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जि. प. च्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करावे, असा ठराव शुक्रवारी झालेल्या जि. प. स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जि. प. अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी शिक्षणाधिकारी सोनटक्के यांच्या कारभाराचा पाढाच वाचला. त्यांच्या कारभाराची चौकशी करावी, असा ठराव शिक्षण समितीने १३ आॅक्टोबर २०१७ च्या बैठकीत घेतला.
२०१२ नंतरच्या कोणत्याही संचिकांना मान्यता देऊ नये, त्यातही प्रामुख्याने आपसी बदली आणि विस्तार अधिकाºयांच्या बदलीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुबाकले आणि प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांची समितीही नेमण्यात आली होती. या समितीला १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र शिक्षण समितीचा ठराव होऊनही दोन्ही अधिकाºयांनी चौकशीच केली नाही. उलट सोनटक्के यांचा जिल्ह्यातील कालावधी पूर्ण न होताच त्यांची स्वजिल्हा हिंगोली येथे बदली करण्यात आली. या प्रकारामुळे जि. प. त गैरकारभार करणाºया अधिकाºयांना बळच मिळेल, असेही साहेबराव धनगे म्हणाले. त्यांच्या कार्यकाळातील अनेक संचिका गायब असल्याचे ते म्हणाले.
सोनटक्के यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कार्यमुक्त करु नये, त्यांना नाहरकत देऊ नये असा ठरावही यावेळी करण्यात आला. सोनटक्के यांचा चौकशी अहवाल दहा दिवसांत सादर करण्याची सूचनाही करण्यात आली.
स्थायी समितीच्या बैठकीत उपाध्यक्ष समाधान जाधव, संजय बेळगे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Nanded district Par. Education Officer's resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.