नांदेड भाजपत शह काटशहाचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:56 AM2018-04-27T00:56:12+5:302018-04-27T00:56:12+5:30

सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील नेत्यांत सुरु असलेल्या या अंतर्गत राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

Nanded BJP's Politics of Shot | नांदेड भाजपत शह काटशहाचे राजकारण

नांदेड भाजपत शह काटशहाचे राजकारण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सर्व प्रमुख पक्ष विधानसभा, लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी करीत असताना भाजपात मात्र अंतर्गत शह काटशहाचे राजकारण सुरु आहे. भाजपाच्या उत्तर ग्रामीण तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांच्या फेरनियुक्तीनंतर भाजपात उघडउघड दोन गट पडल्याचे चित्र असून जिल्हास्तरावरील नेत्यांत सुरु असलेल्या या अंतर्गत राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.
नांदेड उत्तर ग्रामीणचे तालुकाध्यक्ष दीपक पावडे यांची महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी अकार्यक्षम ठरवत पदावरुन हकालपट्टी केली होती. या हकालपट्टीनंतर माजी खासदार भास्करराव खतगावकर गटाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे धाव घेतली. इतकेच नव्हे तर पावडे यांच्या हकालपट्टीस स्थगितीही मिळविली. त्यामुळे शहर जिल्हाध्यक्षांच्या निर्णयाला पक्षात काही स्थान आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. परिणामी हा विषय प्रतिष्ठेचा बनवत शहर जिल्हाध्यक्ष डॉ. हंबर्डे हेही गुरुवारी प्रदेशाध्यक्ष दानवे यांची त्यांनी भेट घेतली.
यावेळी पावडे यांच्यावरील कारवाई पक्षशिस्तीला धरुनच होती. त्यामुळे या कारवाईला दिलेली स्थगिती मागे घेण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. धनाजीराव देशमुख, रामराव केंद्रे, विजय गंभीरे, दिलीपसिंह ठाकूर, मिलिंद देशमुख, बंडू पावडे, राजेंद्रसिंह पुजारी,सुरेंद्र घोडजकर, मोतीराम पाटील मोरे, विनायक कदम, विनायक सगर, व्यंकट मोकले, गणेश घोरपडे आदींची उपस्थिती होती.
तर दुसरीकडे गुरुवारी शहरातील राजेंद्रनगरात पावडे यांच्या फेरनियुक्तीचा खतगावकर गटाने जल्लोष केला. यावेळी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, चैतन्य देशमुख, विनोद पावडे, संतोष वर्मा, जनार्दन ठाकूर आदींची उपस्थिती होती. एकीकडे जल्लोष होत असताना दुसरीकडे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आपला निर्णय योग्य कसा होता हे प्रदेशाध्यक्षांना सांगत होते हे विशेष.
गटबाजीमुळे मनपा ा निवडणुकीत भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यापासून धडा न घेता पक्षातील गटबाजी कमी न होता उघडपणे पुढे येत आहे. महापालिका विरोधी पक्षनेतेपदावरील नियुक्तीचा विषयही गटबाजीमुळेच रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सूचना देवूनही मनपात कोणतीही हालचाल झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेशित करुनही पक्षाच्या एकाही नेत्याने या प्रकरणात लक्ष घातले नाही. आगामी काळातील निवडणुका पाहता भाजपातील गटबाजीला आणखी उधाण येणार हे निश्चित आहे.

भाजप शिस्तीचा पक्ष आहे. पक्षशिस्तीविरुद्ध काम करणाऱ्यावर कारवाई केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष ठरवेल तोच निर्णय पक्षात अंतिम राहतो. पावडेबाबत लवकरच निर्णय होईल, असेही हंबर्डे म्हणाले.

Web Title: Nanded BJP's Politics of Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.