परवानगीविनाच गौण खणिजाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:11 AM2019-05-14T00:11:18+5:302019-05-14T00:11:47+5:30

कोणतीही परवानगी न घेता तसेच अकृषिकचे प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यांपासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा प्रकार नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे सुरू आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले.

Mineral excavation without permission | परवानगीविनाच गौण खणिजाचे उत्खनन

परवानगीविनाच गौण खणिजाचे उत्खनन

Next
ठळक मुद्देकारवाई होईना : गावकऱ्यांनी केली शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार

नांदेड : कोणतीही परवानगी न घेता तसेच अकृषिकचे प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यांपासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा प्रकार नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे सुरू आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून कारवाई करण्याबाबतच्या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आली.
नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे रघुनाथ कमठेवाड यांच्या मालकीच्या गट क्र. ५९५ मधील ४.१७ हेक्टर जमिनीवर एका कंपनीने गिट्टी क्रेशर सुरू केला आहे. या क्रेशरसाठी आवश्यक ती परवानगी जिल्हा गौण खनिज विभागाकडून अद्याप घेण्यात आली नाही. त्याचवेळी नायगाव तहसीलच्या अहवालावरुन आतापर्यंत ५० लाखांहून अधिकची रक्कम जमा करुन घेण्यात आली आहे.
या कंपनीकडून गौण खनिज काढण्यासाठी स्फोटही केले जात आहे. याचा कृष्णूर गावकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. स्फोटामुळे काही घरांना तडेही गेले आहेत. त्याचवेळी क्रेशरच्या धुळीने आजूबाजूची शेती नापीक होत आहे. याबाबत गावकºयांनी नायगाव तहसीलदार तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने फेब्रुवारी २०१९ मध्ये नायगाव तहसीलदारांना कारवाईचे पत्र दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही कारवाई झाली नाही. त्याचवेळी उत्खननही थांबले नाही. दुसरीकडे परिसरातील शेतीचे धुळीने मात्र अमाप नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात घट होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच धुळीमुळे श्वसनाचे विकारही होत आहेत.
या ठिकाणी लाखो ब्रास गौण खनिजाचा साठा केला जात आहे. याकडे महसूलचे अधिकारी का दुर्लक्ष करीत असावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अकृषि प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यापासून अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या गौण खणिज उत्खनणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत असून याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
अकृषिक परवानाच नाही
या कंपनीच्या गौण खनिजाच्या परवानगीसाठी आवश्यक ती कागदपत्रे मागितली होती. ती पूर्ण करण्यात आली नाही. त्यात अकृषिक परवाना ही महत्त्वपूर्ण बाब होती. ती अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. असे असतानाही सदर कंपनीकडून गौण खनिजाचा लाखो ब्रास साठा करण्यात आला आहे. त्याचवेळी लाखो ब्रास माल उचलण्यातही आला आहे. २४ तास येथे उत्खननाचे काम सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात ठेवून आहेत.

Web Title: Mineral excavation without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.