सुरक्षाविषयक प्रबोधनात ‘लोकमत’चा नेहमी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:05 AM2019-01-24T01:05:08+5:302019-01-24T01:06:10+5:30

आजच्या काळात सर्वाधिक प्राधान्य हे सुरक्षिततेला दिले पाहिजे़ लहान-लहान गोष्टींमध्ये बदल करुन आपल्याला आपले जीवन अधिक सुरक्षित करता येते़ त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे़ ‘लोकमत’नेही सुरक्षाविषयक प्रबोधनात नेहमीच पुढाकार घेतला आहे़ त्याबद्दल लोकमत परिवाराचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले़

'Lokmat' is always a pioneer in security studies | सुरक्षाविषयक प्रबोधनात ‘लोकमत’चा नेहमी पुढाकार

सुरक्षाविषयक प्रबोधनात ‘लोकमत’चा नेहमी पुढाकार

Next
ठळक मुद्देलोकमतचा शॉपिंग फेस्टिव्हल पोलीस अधीक्षक जाधव यांचे प्रतिपादन

नांदेड : आजच्या काळात सर्वाधिक प्राधान्य हे सुरक्षिततेला दिले पाहिजे़ लहान-लहान गोष्टींमध्ये बदल करुन आपल्याला आपले जीवन अधिक सुरक्षित करता येते़ त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे़ ‘लोकमत’नेही सुरक्षाविषयक प्रबोधनात नेहमीच पुढाकार घेतला आहे़ त्याबद्दल लोकमत परिवाराचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले़
‘लोकमत’च्या वतीने सखी आनंदोत्सव शॉपिंग फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस अधीक्षक जाधव बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर महापौर शीलाताई भवरे, किशोर भवरे, सभापती शीलाताई निखाते, मुख्य प्रायोजक कोनाळे कोचिंग क्लासेसचे व्ही़ डी़ कोनाळे, लोकमतचे सरव्यवस्थापक विजय पोवार, जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांची उपस्थिती होती़ यावेळी पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, आमच्याकडे येणाऱ्या महिला या कौटुंबिक हिंसाचाराने पीडित असलेल्या असतात़ सामान्य गृहिणींशी संवाद साधण्याची संधी आम्हाला मिळत नाही़ ‘लोकमत’च्या माध्यमातून गृहिणींशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे़ आता नांदेड हे पूर्वीसारखे राहिले नाही़ यापूर्वी मी १९९५ मध्ये नांदेडात होतो़ आजच्या नांदेडचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे़ शहरीकरण वाढले आहे़ त्याचबरोबर समस्याही आहेत़ त्यात सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे़ आपण लाखो रुपयांचे घर घेतो, त्याच्या सजावटीवर खर्च करतो़ परंतु, सर्वात महत्त्वाची गोष्ट असलेल्या कुलूप आणि कडी-कोंड्याबाबत दुर्लक्ष करण्यात येते़ घराबाहेर जाताना कपाटाच्या चाव्याही नेहमीच्याच ठिकाणी ठेवतो़ पूर्वीच्या काळी घरातील आजी नेहमी पैशांची जागा बदलत असत़ त्यामागे ते पैसे सुरक्षित राहण्याचा उद्देश होता़ त्यामुळे लहान-लहान गोष्टींवर लक्ष दिल्यास अनुचित प्रकार आपल्याला टाळता येतील़ त्यासाठी महिलांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचेही जाधव म्हणाले़ तत्पूर्वी किशोर भवरे यांनी लोकमत सखी मंच हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे म्हणाले़ प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के तर जाहिरात व्यवस्थापक राजेंद्र घाडगे यांनी आभार मानले़ सूत्रसंचालन सपना भागवत यांनी केले़

Web Title: 'Lokmat' is always a pioneer in security studies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.