पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाची हत्या करणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:03 PM2019-05-13T17:03:37+5:302019-05-13T17:08:21+5:30

१८ मे २०१६ च्या रात्री पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन मारहाण

Life imprisonment for woman who murdered one person in money dispute | पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाची हत्या करणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा

पैशाच्या देवाण-घेवाणीतून एकाची हत्या करणाऱ्या महिलेस जन्मठेपेची शिक्षा

googlenewsNext

नांदेड : पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन एका व्यक्तीस जीवे मारल्याप्रकरणी महिलेला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक घोळकिया यांनी १३ मे रोजी सुनावली.

किनवट तालुक्यातील सारखणी येथे १८ मे २०१६ च्या रात्री पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन सुरेशराव खेकारे (वय ५०) हे जनाबाई रमेश पवार (वय ४५) यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. याच वादातून खेकारे यांना जनाबाई पवार हिने बेदम मारहाण केली होती. 

मयताचा मुलगा कुणाल हा १७ मे रोजी माहूर येथे गेला होता. त्याने आपले पिता सुरेश यांना फोन केला. त्यावेळी फोन न घेतल्याने कुणाल घरी आला. घरी येवून आईला विचारले असता दुपारपासूनच खेकारे घराबाहेर गेले असल्याचे सांगितले. याचवेळी कुणाल हा पित्याला शोधण्यासाठी जनाबाईच्या घरासमोरुन जात असताना घरातून आवाज आला. पण त्याबाबत कुणालने काही विचारणा केली नाही.

१८ मे च्या रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी सुरेशराव हे जनाबाईच्या घरात मरण पावल्याची माहिती कुणाल व त्याच्या कुटुंबियाला दिली. या घटनेप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक आर.के. खरात यांनी केला होता.

या प्रकरणाच्या तपासात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात जनाबाई पवार हिने खेकारे यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. या खून प्रकरणात जनाबाईला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्या. दीपक घोळकिया यांनी ठोठावली. सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड. रणजीत देशमुख यांनी मांडली तर अ‍ॅड. पी.एन. शिंदे यांनी आरोपीचा बचाव केला. तर पुराव्याअभावी गंगाबाई उत्तम  चव्हाण, प्रफुल्ल उत्तम चव्हाण आणि दिनेश उत्तम चव्हाण या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Web Title: Life imprisonment for woman who murdered one person in money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.