कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:04 AM2018-10-06T01:04:18+5:302018-10-06T01:04:21+5:30

तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.

Kandahar Taluka Survey Report Announced | कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

कंधार तालुका सर्वेक्षण अहवाल जाहीर

Next
ठळक मुद्देखरीप नजर आणेवारी सरासरी ६० : शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या सुधारित व अंतिम आणेवारीकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्यातील १२६ महसूल गावांचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाने केले होते. त्यातून नजर आणेवारी काढण्यात आली. ती जाहीर करण्यात आली असून सरासरी ६० नजर आणेवारी आल्याचे समोर आले आहे. परंतु, विविध रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या पिकांचे उत्पादन कमालीचे घटणार असल्याने सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.
कंधार तालुक्यातील शेतीची मदार निसर्गपावसावर आहे. खरीप लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. रबी व सिंचन क्षेत्र तसे नाममात्र आहे. निसर्गाच्या लहरीपणाला शेतकरी वैतागला आहे. गत काही वर्षांत शेतीला सातत्याने फटका बसत आहे. त्यामुळे शेतक-यांचे अर्थकारण कमालीचे नाजूक बनत चालले आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाला होता. यावर्षी मोठ्या उत्साहात शेतकरी शेतीतून उत्पादन काढण्याची अपेक्षा बाळगून होता.
परंतु कापसाला पडलेला बोंडअळीचा विळखा, सोयाबीनला करपा रोगाचे चक्र, बुरशीजन्य रोग आदीने कमालीचा पिकांना फटका बसला. सोयाबीन काढणी चालू असून त्याचा उतारा मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे चित्र आहे. आता नजर आणेवारी जाहीर केली आहे. ती शेतकºयांचे समाधान करू शकणारी नाही.
नजर आणेवारी तहसीलदार संतोषी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार ताडेवार, लिपिक वर्षा डहाळे यांच्या सहकार्याने मंडळ अधिकारी एस.एम.पटणे, बी.एल.वाघमारे, हेमंत सुजलेगावकर, एन.जी. गजलवार, एम.ई.मेथे, एस.एम.धोंडगे यांनी सर्वेक्षण करून परिश्रम घेतले. ५० पेक्षा अधिक आणेवारी आली आहे. त्यामुळे आता सुधारित व अंतिम आणेवारीकडे शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत. यातूनच खरीप पिकाचे वास्तव चित्र समोर येईल, अशी शेतक-यांची धारणा आहे.
शेती व्यवसायात आता बी बियाणे, खते, फवारणी औषधीच्या वाढत्या किमती, सालगड्याचे वाढलेले भाव, शेतमजुराची वाणवा, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आदी समस्यांनी शेतकरी घायगुतीला आला आहे. त्यातच निसर्ग पावसाच्या लहरीपणाची भर पडत आहे. त्यामुळे लागवडखर्चही निघणे कठीण झाले आहे. आता नजर आणेवारी काढून महसूल प्रशासनाने उत्पादनाचा लेखाजोखा जाहीर केला आहे. परंतु, शेतकरी सुधारित व अंतिम आणेवारीकडे डोळे लावून आहे.
पावसाचा लपंडाव कायम !
कंधार तालुक्यातील सहा मंडळांतील नजरी पैसेवारी सरासरी ६० आहे. कंधार मंडळात १० हजार ८३९ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची नजरी पैसेवारी ६० घोषित झाली आहे. कुरूळा मंडळात १२ हजार ३८४ हेक्टर पेरणी व ६० पैसेवारी, फुलवळ १२ हजार २७२ हेक्टर पेरणी व ५८ पैसेवारी, बारूळ १० हजार ९५९ हेक्टर पेरणी व ६१, पेठवडज १० हजार ८०३ हेक्टर पेरणी व ६१ आणि उस्माननगर मंडळात ९ हजार ३५४ हेक्टर पेरणी करण्यात आली होती. त्याची पैसेवारी ६० घोषित करण्यात आली आहे़ कुरूळा व फुलवळ मंडळात शेतकºयांनी सर्वात जास्त पेरणी केली. परंतु, पावसाचा लपंडाव होत राहिला़

Web Title: Kandahar Taluka Survey Report Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.