समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:54 AM2018-02-20T00:54:58+5:302018-02-20T00:56:48+5:30

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़

 It is necessary to bring Shivrajaya's thinking into practice | समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे

समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे

Next
ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे प्रतिपादनसार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित सोहळा उत्साहात


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीधर्मातील मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य उभे केले़ जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शिवरायांच्या विचार आणि कार्यातून मिळते़ आज सामाजिक गरजा ओळखून सर्वांनी एकत्र येवून विषमता दूर करून समता प्रस्थापित करण्याची गरज आहे़ त्या कार्यासाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
नवा मोंढा येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ ते म्हणाले, आज शिवरायांचा जन्मोत्सव जगभरात साजरा होतो, ही तमाम बहुजन समाजासाठी अभिमानाची बाब आहे़ आजच्या परिस्थितीत निर्माण होणारे प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत, हे ओळखून ते रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे़ शेतकरी आत्महत्या रोखणे ही सर्व समाजाची सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी पुढाकार महत्त्वाचा असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ मराठा आरक्षणासाठी काढलेल्या लाखोंच्या मोर्चानंतरही सरकारदरबारी दखल घेतली जात नाही़ ही खेदाची बाब असून मराठा समाजाला बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे खा़चव्हाण म्हणाले़ येणाºया काळात लाखोंच्या मोर्चाची दखल न घेतल्यास वेगळ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले़ मी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकारी म्हणून नाही तर समाजबांधव म्हणून उपस्थित राहिलो़ यापुढेही समाजाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सदैव आपल्यासोबत असेल, असे आश्वासन खा़ चव्हाण यांनी दिले़ दरम्यान, खा़अशोकराव चव्हाण यांनी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला़
आ़डी़पी़सावंत, आ़ हेमंत पाटील, डॉ़ मीनल खतगावकर आदींची समयोचित भाषणे झाली़ दरम्यान, ‘शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे?’ या प्रा़ संतोष देवराये यांच्या डॉक्युमिट्रीच्या सीडीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले़
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेवून आज त्यांचा जन्मोत्सव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करीत असल्याचे सांगितले़ तसेच मराठा समाजातील मुलींसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहाच्या पूर्णत्वासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा़ ज्यांना शक्य वेळ, पैसा, साहित्य, बौद्धिकता आदींद्वारे मदत करावी, असे आवाहन केले़ सूत्रसंचालन प्रा़संतोष देवराये, रमेश पवार यांनी तर स्वागताध्यक्ष नानाराव कल्याणकर यांनी आभार मानले़

Web Title:  It is necessary to bring Shivrajaya's thinking into practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.