‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:26 AM2018-11-28T00:26:44+5:302018-11-28T00:27:12+5:30

चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.

The huge disturbance of the saints in 'power distribution' | ‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

‘वीज वितरण’ मध्ये संतप्तांचा प्रचंड गोंधळ

googlenewsNext

धर्माबाद : पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने वीजबिल भरूनही, वीजपुरवठा करण्यास टाळाटाळ झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी धर्माबाद कार्यालयात गोंधळ घालून सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करु, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
रत्नाळी शिवारातील एक-दीड महिन्यांपूर्वी डीपी जळाल्याने शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐन भिजवणी पिकांना पाणी देणे बंद पडले. हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात होती. तब्बल दीड महिन्यांपूर्वीच डीपी जळाल्याचे संबंधित विभागाला लेखी, तोंडी सांगितले. वीजबिल भरले, तरीही वीज वितरण डीपी बसविण्यात दीड-दीड महिना वेळ लागत असल्याने संतापून शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले. यावेळी शेतकरी मारोती पाटील जाधव, नरेश रेडी आरकलवार, कांतराव रत्नाळीकर, बाबूराव जाधव, मारोती मदनूरकर, नरेश मुनलोड, सुरेश माळी, लक्ष्मण ईप्तेकर, गंगाधर लालू आदी शेतकरी उपस्थित होते.

.. तर शेतात आत्महत्या करु, शेतक-यांचा पवित्रा

  • चोवीस तासांत वीजपुरवठा नाही केल्यास शेतात आत्महत्या करू असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
  • हाताला आलेली पिके पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतक-यांत संताप
  • शेतक-यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन वीज वितरण सहाय्यक अभियंता पांडे यांना धारेवर धरले.                                                                                      

यासंदर्भात देगलूर येथील मुख्य कार्यकारी अभियंता गोपुलवार यांच्याशी संपर्क केला असता उद्या दोन डीपी पाठवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शेतकरी शांत झाले. अन्यथा जोपर्यंत डीपी बसविणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून हटणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. याशिवाय अनेक भागांत डीपी जळालेली उदाहरणे असून पाण्याअभावी पिके करपून जात असल्याने अनेक शेतकºयांच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, धर्माबाद तालुक्यातील विजेची अवस्था बिकट झाली आहे. चुकीची बिले देणे, रिडींग न घेता अंदाजीत बीले अदा करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही पथदिवे नुसतेच उभे असल्याने ते शोभेची वास्तू ठरले आहेत. नांदेडच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बिल भरुनही वीज देण्यास टाळाटाळ

  • तालुक्यात सोळा डीपी जळालेले आहेत़ डीपीची मागणी केली तर अ‍ॅडजस्टमेन्ट करा म्हणून वरिष्ठ अधिकारी ताकीद देतात. अन्यथा वरिष्ठ अधिकारी मला निलंबित करण्याची धमकी देतात, असे दोन वेळेस निलंबित झालो आहे. मी कोणाचे ऐकू, इकडे शेतकरी, नागरिक दररोज येऊन त्रास देतात. मला नोकरी टिकवायची आहे. वरिष्ठानी डीपी दिले तर डीपी पाठवेन, पण स्वखर्चाने वाहने भाडे करून डीपी भोकरवरून आणावे लागेल असे सदरील शेतक-यांना सहाय्यक अभियंता पांडे यांनी सांगितले.
  • दीड महिना झाले तरीही जळालेली डीपी बसवित नाहीत़ लेखी पत्र, तोंडी सांगितले तरीही उडवाउडवीचे उत्तर देतात. मग पिकाला पाणी कसे द्यावे, याचे वीजबिलही भरलो आहोत, तरीही निष्क्रिय महावितरण लक्ष देत नाही असे मत शेतकरी नरेश रेडी आरकलवार, मारोती पाटील जाधव यांनी मांडले़

Web Title: The huge disturbance of the saints in 'power distribution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.