हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:09 AM2019-05-20T00:09:30+5:302019-05-20T00:11:47+5:30

हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

Held from a hailstorm, the farmers would be relieved | हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

हळदीला भाव नसल्याने शेतकरी झाला हवालदिल

Next
ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर तालुका : अपुऱ्या पावसाने उत्पादनही घटलेउत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ लागेना

श्रीक्षेत्र माहूर : हळदीला गतवर्षी ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता़ त्या तुलनेत सुरुवातीच्या काळात चांगला भाव असला तरी हळदीला सध्या मात्र सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने एकरी उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयापैकी पाऊस झाला तर एकरी किमान १५ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते़ मात्र यावर्षी आॅगस्ट २०१८ मध्ये आलेल्या महापुरानंतर वरूणराजाने अवकृपा केल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकांच्या उत्पादनावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला असून हळदीचे उत्पादन निम्म्यावरच आले आहे. त्यातच भाव कमी मिळाल्याने बळीराजाचे वार्षिक आर्थिक नियोजन बिघडले असून बळीराजात कहीं खुशी कहीं गम असे वातावरण दिसून येत आहे.
माहूर तालुक्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. तालुक्यातील ४१५ हेक्टर क्षेत्रांवर हळद पिकाची लागवड केली आहे. एका एकरासाठी जवळपास ८ ते १० क्विंटल हळदीचे बियाणे लागते. तसेच प्रतिएकरासाठी बियाणापासून ते लागवडीपर्यंतचा उत्पादन खर्च विचारात घेतला तर सध्या बाजारपेठेमध्ये हळदीला मिळत असलेले भाव परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. गतवर्षी १५ ते २० क्विंटल उतारा असलेले हळदीचे उत्पन्न यावर्षी एकरी १० ते १५ क्विंटल एवढाच उतारा येत आहे.
पाण्याच्या उपलब्धतेचा अभाव याचा देखील हळद उत्पादनावर परिणाम झाला आहे. ६ ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून उत्पादनखर्च व मिळालेल्या उत्पन्नाचा ताळमेळ लावताना बळीराजाच्या नाकीनऊ येत आहेत. शेतातील मिळणा-या उत्पादनातून आपले वार्षिक आर्थिक नियोजन करण्याच्या अपेक्षा बाळगून असलेल्या शेतक-यांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी हळदीचे पीक हे हमी उत्पन देणारे पीक असल्यानेच प्रतिवर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे दिसत आहे. हळद उत्पादक शेतकºयांच्या अडचणीकडे प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे.

यावर्षी अत्यल्प पावसाने हळद पिकाचे उत्पन्न घटले असून जलस्त्रोत आटल्यामुळे पाणी देण्याससुद्धा पुरेसे पाणी बसल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न निम्म्याने घटले असून सुरुवातीच्या काळात चांगला भाव होता. मात्र नंतरच्या काळात बाजारात आवक वाढल्यानंतर भाव पाडल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे
-विनायक पुंडलिकराव कुटे, हळद उत्पादक शेतकरी, सायफळ

Web Title: Held from a hailstorm, the farmers would be relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.