शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:06 AM2018-03-30T01:06:47+5:302018-03-30T11:52:32+5:30

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे पुढे आले आहे.

Going to school is a game! | शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ !

शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये जिल्ह्यातील २६७ शाळांमधील तब्बल ५७५ वर्गखोल्यांची अवस्था दयनीय असून १३९ शाळांमधील २७० वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे.
खासगी शाळांचे प्रस्थ वाढले असले तरीही, अद्यापही शहराबरोबरच ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्येच शिक्षण घेत आहेत. या शाळांना पूरेशा पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला कोट्यवधी रूपयांचा निधीही मिळतो. या निधीतून वर्गखोल्यांच्या बांधकामांसह खोल्यांची दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील अनेक शाळांची अवस्था दयनिय असल्याचेच या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल सांगतो.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे केलेल्या आॅडिटमध्ये ५७४ वर्गखोल्या पाडाव्या लागणार आहेत. यात देगलूर तालुक्यातील सर्वाधिक ८४ वर्गखोल्यांचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील ६३, उमरी- २०, नायगाव- ३४, मुदखेड - १४, माहूर - ४४, लोहा- २७, किनवट - ४, कंधार - ४६, हिमायतनगर - १५, हदगाव - ४७, धर्माबाद - ३५, बिलोली - ३२, भोकर - ३४, अर्धापूर - २९ तर नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ४६ वर्गखोल्या पाडण्याची आवश्यकता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या वर्गखोल्यांची सुधारणा करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाचा निधीवरच जिल्हा परिषदेची मदार आहे.

स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये वर्गखोल्यांची दुरवस्था उघड
४ हदगाव तालुक्यातील शाळांच्या दुरूस्तीची आवश्यकता जि.प. बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये २७० वर्गखोल्यांची दुरूस्ती होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये हदगाव तालुक्यातील सर्वाधिक १११ वर्गखोल्या तर कंधार आणि किनवट तालुक्यातील प्रत्येकी ६०, भोकर १७, बिलोली- १३, देगलूर - ५, हिमायतनगर - ३१, मुखेड - ९, माहूर - ७, नांदेड, धर्माबाद प्रत्येकी चार, मुदखेड- २, नायगाव - ३ तर उमरी आणि लोहा तालुक्यातील एका वर्गखोलीची दुरूस्ती होणे आवश्यक आहे.

Web Title: Going to school is a game!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.