हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:53 AM2018-05-24T00:53:07+5:302018-05-24T00:53:07+5:30

सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.

Farmers' suicides in Hadagat decreased | हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

googlenewsNext
ठळक मुद्देपीक विमा, राष्ट्रीय महामार्ग जमिनीच्या मोबदल्याचा परिणाम: २०१७ मध्ये १३ तर २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या

सुनील चौरे
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.तर २४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहेत. सन २०१७-१८ या दोन वर्षांत मात्र ही संख्या घटली. हे एक चांगले लक्षण असून पीक विमा व राष्ट्रीय महामार्गाने जमिनीचा मोबदला हे एक कारण त्यापाठीमागे असल्याची चर्चा आहे.
पूर्वी शेतकरी खाजगी सावकारांकडून पेरणी, लग्न, शिक्षणासाठी कर्ज घेत. पिकाला उतारा न आल्याने सावकाराचे कर्ज फिटत नसे व हा आकडा फुगत जायचा. आता शेतकरी हुशार झाले. शेतात पेरलेल्या पिकाचा विमा काढू लागले व अतिवृष्टीने किंवा अल्प पावसाने पीक गेले तर त्याला पीक विम्याचे कवच मिळाले. शासनाच्या वेगवेगळ्या योजना, अनुदानामुळेही शेतकरी सुखावला. पिकाला मिळणारा हमीभाव बाजारपेठेत त्याची होणारी लूटही कायद्याने खरेदी- विक्री आॅनलाईन करुन थांबविल्याने व्यापाºयाचा नफा कमी होऊन तो शेतकºयाच्या पदरात पडू लागला.
खते, बी-बियाणे, औषधी यांची खरेदी- विक्री आॅनलाईन झाल्याने काळा बाजार मंदावला. शेततळी, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवारअंतर्गत केलेली बंडींगची कामे याचाही आधार शेतकºयांना झाला.
शेतकºयांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत मिळाली. त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला ही काही प्रमुख कारणे सांगता येतील.
शेतीला पुरक योजना दुधाळ जनावरे, फळबागा ठिबक, तुषार यांचा पुरवठा करण्यात आला. कमी पावसात येणारे वाण बाजारात आल्याने शेतकºयांना फायदा झाला. १३ गावांतील शेतकºयांच्या जमिनीचे मोजमाप २०१७ पासून सुरू झाले.
त्यामुळे जमिनीचा मोबदला चांगला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या व मोबदला मिळालाही. या रकमेचा फायदा सामान्य शेतकºयांसह सधन शेतकºयांनाही झाला. त्याचबरोबर त्यांच्या लेकीबाळी पाहुणे यांनाही झाला.
युवक मंडळी पारंपरिक शेती न करता नगदी पिकांकडे वळली. भाजीपाला घेत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी पाण्यात चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत. आत्महत्या करणारी गावे पाहिली तर एकाच गावात वारंवार आत्महत्या घडल्या आहेत.
यामध्ये हरडप, मनाठा, निवघा, चोरंबा (बु.), कोहळी, चिकाळा, कोहली, येवली, वायफना, तळेगाव, ल्याहरी, निमगाव, सावरगाव, बरडशेवाळा, पाथरड, पिंगळी, तळणी ही ठरलेली गावे आहेत. यामध्ये भीषण वास्तव म्हणजे मराठा समाजाच्या ४० आत्महत्या आहेत. हा चिंतनाचा विषय आहे.
२४ शेतकरी कुुटुंबांना छदामही नाही
सन २०१३ मध्ये ८ आत्महत्या झाल्या. सन २०१४ हाच आकडा १५ वर गेला. सन २०१५ मध्ये २० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. सन २०१६ मध्ये हीच संख्या २३ वर गेली. परंतु, २०१७ मध्ये आकडा कमी झाला व ही संख्या १३ वर आली. सन २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या शेतकºयांनी केल्या. सहा वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ८६ आहे. त्यापैकी ६० शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र ठरली तर २४ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकºयांची प्रकरणे पात्र ठरली त्यांच्या कुटुंबाना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. परंतु, २४ शेतकरी कुटुंबांना छदामही मिळाला नाही. त्यामुळे त्या कुटुंबांच्या अडचणीत वाढच झाली.
सावकाराचा जाचक पाशही आवळला !
शेतकºयाने आत्महत्या केली की त्यांच्या कुुटुंबाला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे ते आत्महत्या करतात. असा सूर काही वर्षांपूर्वी निघत होता. परंतु, सन २००८ पासूनची अनेक प्रकरणे समितीने अपात्र ठरविल्यामुळे हा आरोप खोटा ठरतो. परंतु, या दोन वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मात्र तालुक्यामध्ये कमी झाले आहे. सतत वाढणारा आकडा सन २०१७ मध्ये १३ वर आला. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता शेतकºयांना मिळणारा पीक विमा. यामुळे अनेक शेतकºयांना पेरणीसाठी वरदान ठरला. खाजगी सावकाराचा जाचक पाशही कायद्याने तोडला.

Web Title: Farmers' suicides in Hadagat decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.