सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:47 AM2019-05-22T00:47:20+5:302019-05-22T00:47:25+5:30

लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले

Facilitator app training for officials and employees | सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देमतमोजणी : सुविधा अ‍ॅपवरील माहिती उमेदवार, मतदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही ठरणार उपयुक्त

नांदेड : लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले आहे़ या सुविधा वेब एप्लीकेशवर मतमोजणीदरम्यान माहिती कशी टाकायची याचे प्रशिक्षण अधिका-यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीचे काटेकोर नियोजन केले जात आहे. मंगळवारी अधिकाºयांना सुविधा अ‍ॅपवर मतमोजणी कालावधीत कोण-कोणती माहिती भरायची याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कर्मचारी, पर्यवेक्षक यांना बुधवारी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत व्हीव्हीपॅटवरील मतदान कसे मोजले जाईल, याकडे लक्ष लागले असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. मोजणीसाठी या व्हीव्हीपॅट मशीनची निवड रॅन्डम पद्धतीने केली जाणार आहे.
मॉकपोल आणि ईव्हीएम मशीनमधील आकडे वेगवेगळे असले तर त्यावेळीही व्हीव्हीपॅटमधील मतदानाचीच मोजणी केली जाणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जाणार आहे.
प्रशासकीय यंत्रणेची काटेकोर तयारी
मतमोजणी प्रक्रियेसाठी जवळपास ५५० अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर नागरिकांनी गर्दी न करता आपल्या मोबाईलवर सुविधा एप्लिकेशन डाऊनलोड करून निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केले आहे.

Web Title: Facilitator app training for officials and employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.