बोथी, तुराटी गावात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:32 AM2019-07-13T00:32:47+5:302019-07-13T00:34:36+5:30

तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

Dowry sowing crisis in Bothi, Turati village | बोथी, तुराटी गावात दुबार पेरणीचे संकट

बोथी, तुराटी गावात दुबार पेरणीचे संकट

googlenewsNext
ठळक मुद्देउमरी तालुक्यातील चित्रतुराटीच्या गावकऱ्यांनी दिले निवेदनआर्थिक मदतीसाठी तहसीलदारांना बोथी

उमरी : तालुक्यातील बोथी व तुराटी या अतिदुर्गम व उंच माळरानावरील भागात पाऊस पडला नसल्याने नुकतेच वर आलेले मोड वाळून जात आहे. त्यामुळे या भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बोथी व तुराटी येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन जनावरांसाठी चारा छावणी उभी करण्याची मागणी बोथी व तुराटीच्या शेतकºयांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
गतवर्षी पावसाअभावी दुष्काळाचे चटके सोसलेल्या बोथी व तुराटी गावात सुरुवातीला पाऊस पडला. पुन्हा पडण्याच्या आशेने शेतकºयांनी कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूग आदी पिकांची लागवड केली. मात्र यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ९० टक्के पिके वाळून गेली. यासंदर्भात शेतकºयांनी तहसीलदार मृणाल जाधव यांना निवेदन दिले. माजी जि.प.सदस्य मारोतराव कवळे, प्रभाकर पुयड, भाजपाचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढगे, दिलीप सावंत, मुकुंदराव सावंत, दिलीपराव सावंत, मुकुंदराव सावंत, पिराजी मुंडलोड, बेलकोंडे आनंदराव, तुकाराम खांडरे, बोथीच्या सरपंच सागरबाई लखमोड, उपसरपंच जयश्री तमलवाड, लक्ष्मण सावंत, दिगांबर सावंत, साईनाथ तमलवाड, पापन्ना सुभानजोड, माणिकराव करपे, लक्ष्मणन राजेन्ना नागुलवाड, नारायण सावंत, सुभानजोड मारोती, संतोष बोधलोड, संजय खांडरे, सुभाष सावंत, सुभाष सावंत, रमेश सुळकेकर, साईनाथ करपे, लक्ष्मण श्रीरामवार, संजय सावंत, मारोती गुरलोड आदी उपस्थित होते.

Web Title: Dowry sowing crisis in Bothi, Turati village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.