खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:09 AM2018-07-19T01:09:22+5:302018-07-19T01:09:42+5:30

तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़

Consumption of soybean | खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

खरिपात सोयाबीनचाच बोलबाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : तालुक्यातील लागवड क्षेत्र ४५ हजार ८८९ क्षेत्रापैकी तब्बल २२ हजार ४४१ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा झाला आहे़ खरीप हंगामात सोयाबीनच्या पिकालाच शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे या हंगामात सोयाबीनचाच बोलबाला दिसून आला़ तालुक्यात बहुतांश महसूल क्षेत्रांतर्गत सोयाबीनचा पेरा सरासरी ५० टक्के आहे़ गतवर्षीच्या तुलनेत १७ जुलैअखेर ५१ मि़मी़ पाऊस जास्त झाल्याने पिकांची स्थिती सध्यातरी भरभक्कम आहे़
कापूस पिकाला गतवर्षी बोंडअळीने ग्रासले असल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले़ राज्य शासनाने एकरी अनुदान मंजूर केले होते; पण या अनुदानामुळे कापूस लागवडीचा खर्चदेखील भागला नाही़ कापूस विक्रीला बाजारात भाव नाही तर कापूस वेचणीला शेतमजूर मिळत नाहीत, ही मुख्य अडचण आता शेतकºयांसमोर आहे़ शेतमजुरांच्या विश्वासावर शेती करणे आता सोपे नाही़ त्यामुळे अद्ययावत यंत्रसामग्रीचा वापर सुरू झाला़ ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे केली जात असून ९० टक्के पेरण्या ट्रॅक्टरनेच करण्यात आल्याचे पुढे आले आहे़ खरीप हंगामाच्या काळात कोरडवाहू व ओलिताखाली असलेल्या शेतीमध्ये जवळपास १० वेगवेगळी पिके घेतली जातात़ तर पशुपालक शेतकरी दुग्धव्यवसायासाठी चारा या पिकांची लागवड करतात़ यावर्षी जवळपास दीडशे हेक्टरमध्ये तालुक्यात चारा लागवड केलेली आहे़
सन २०१७-१८ च्या तुलनेत तालुक्यात तीन हजार हेक्टरमध्ये कापसाचा पेरा घटला आहे़ बोंडअळीचा परिणाम झाल्याने कापसाचा पेरा कमी झाल्याचे चित्र आहे़ तूर पिकाचा पेरादेखील पाचशे हेक्टरमध्ये घटला आहे़ गतवर्षी दोन्ही पिकांना आर्थिक फटका बसला होता़ तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शासनाकडून खरेदी झाली़
मूग-उडदाचीही दीड हजार हेक्टरमध्ये घट झाली आहे़ यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीचा संयुक्त कृषी-महसूल-पंचायतने अहवाल तयार केला असून सोयाबीन पिकांचा पेरा धमाकेदार आहे़ गतवर्षीदेखील सोयाबीनचा उतारा वाढला होता़ पेरणी, काढणी आदी कामे तेलंगणा, पंजाब राज्यातील यंत्रसामग्रीद्वारे केली जात होती़ त्यामुळे शेतमजुरांच्या तुटवड्यामुळे शेतकºयांनी भाड्याने एकरी दराप्रमाणे पेरणी केल्याचे चित्र पुढे आले आहे़
सोयाबीनची खरेदीदेखील गावपातळीवर करण्यात आल्याने सोयीचे झाले होते़
---
तालुक्यात पाच महसूल मंडळातंर्गत ५७ हजार ८२१ भौगोलिक क्षेत्र आहे़ सन २०१८ खरीप हंगामअंतर्गत ४५ हजार ८८९ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे़ ५८ हजार क्षेत्र असले तरी ४८ हजार क्षेत्र लागवडलायक आहे़ यापूर्वी कापूस या पिकाला शेतकºयांची पहिली पसंती राहत होती; पण गतवर्षीपासून सोयाबीन पिकांनाच महत्त्व दिले जात आहे़
---
तालुक्यात पाच महसूल मंडळांतर्गत बिलोली परिसरातील ५ हजार ३०० हेक्टरमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा आहे़ त्याखालोखाल सगरोळी ४ हजार ८००, कुंडलवाडी ४ हजार ४०० हेक्टर, लोहगाव क्षेत्रात ४ हजार ६००, आदमपूर साडेतीन हजार हेक्टरमध्ये पेरा झाला़ यावर्षी तालुक्यात केवळ साडेआठ हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली़
मूग, उडीद ही दोन पिकेदेखील साडेआठ हजार हेक्टरमध्येच आहेत़ गतवर्षीची तूर वेळेवर विक्री झाली नाही़ अजूनही शासनाकडून नाफेडवर झालेली खरेदीची देयके मिळाली नाहीत़ त्यामुळे या हंगामात तूर केवळ ५ हजार ३२३ हेक्टर क्षेत्रात आहे़ खरीप ज्वारीपेक्षा भात (साळी) लागवड जास्त असून भात पीक ४२५ हेक्टर तर ज्वारी केवळ १२५ हेक्टरवर पेरा झाला़

Web Title: Consumption of soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.