स्वारातीमला उत्कृष्ट शंभर विद्यापीठात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:34 AM2018-12-21T00:34:51+5:302018-12-21T00:36:18+5:30

सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गतच्या सक्षम महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bringing myself to excellent hundred university | स्वारातीमला उत्कृष्ट शंभर विद्यापीठात आणणार

स्वारातीमला उत्कृष्ट शंभर विद्यापीठात आणणार

Next
ठळक मुद्देकुलगुरू भोसले एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये झाला हृद्य सत्कार

नांदेड : सर्व शाखातील समतोल अभ्यासक्रम तयार करण्याबरोबर महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी सांगितले. स्वारातीम विद्यापीठाला देशातील शंभर उत्कृष्ट विद्यापीठात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, विद्यापिठाअंतर्गतच्या सक्षम महाविद्यालयास स्वायत्तता देण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वारातीम विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांचा एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या संचालीका डॉ. गीता लाठकर, प्राचार्य डॉ.शिरीष कोटगीरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्यापीठ कार्यक्षेत्रात अत्यंत कमी महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले आहे. पुढील एक ते दिड वर्षात यामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने प्रयत्न तसेच पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, मराठवाड्यात शिक्षणाचे रोपटे लावणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थाच्या नावाने स्थापन झालेल्या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याचा मान मिळाल्याबद्दल कमलकिशोर कदम यांनी कुलगुरूंचा सन्मान केला. डॉ. भोसले यांनी गुणवत्ता असूनही विनय सोडला नाही, जिथे गेले तिथे त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविल्याबद्दल गौरवोद्गार काढत, सहका-यांना सोबत घेवून उत्कृष्ट प्रतिचे काम करण्यात ते आजवर यशस्वी झाले आहेत. मराठवाड्याचा माणूस पुढील काळात मुंबई-पुणे विद्यापीठाचा कुलगुरू व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करीत, पुढील प्रवासात देशातील नामांकित विद्यापीठाचे नेतृत्त्व करण्याच्या शुभेच्छाही कमलकिशोर कदम यांनी कुलगुरूंना भोसले यांना दिल्या.
यावेळी ग्रंथपाल डॉ. गोविंद हंबर्डे यांनी कुलगुरूंच्या शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. डॉ.गीता लाठकर यांनी प्रास्ताविकात डॉ.उद्धव भोसले यांच्या एमजीएममधील उत्कृष्ट शिक्षक असल्याच्या अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाला विभाग प्रमुख डॉ.अर्चना राजुरकर, डॉ.दीपक पत्तेवार, डॉ.जसबिरसिंग सिद्धू, डॉ.कल्पना जोंधळे, प्रो.एच.ए.हाश्मी, रिमोट सेंटर समन्वयक प्रा.ज्योती पाटील, प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रमुख प्रा.नारायण कदम, टीपीओ शिवप्रसाद तितरे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Bringing myself to excellent hundred university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.