स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:35 AM2018-03-24T00:35:12+5:302018-03-24T11:54:37+5:30

लिंगायत हा पुरातन धर्म असून या स्वतंत्र धमार्ची नोंद ब्रिटिश काळात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र या धर्मास हिंदु धर्मात समावेश करण्यात आले. त्यामुळे या धर्मावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी नांदेड येथे करण्यात आली,

Asserting independent Lingayat Dharma | स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता द्या

स्वतंत्र लिंगायत धर्मास मान्यता द्या

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : लिंगायत समन्वय समितीचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :लिंगायत हा पुरातन धर्म असून या स्वतंत्र धमार्ची नोंद ब्रिटिश काळात होती. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र या धर्मास हिंदु धर्मात समावेश करण्यात आले. त्यामुळे या धर्मावर मोठा अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्माची मान्यता देवून या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी नांदेड येथे करण्यात आली,
नांदेड शहर जिल्हा काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घवून निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, १९३१ पर्यंत लिंगायतांची धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून जनगणनेत नोंद होती. या सर्व बाबी लक्षात घेवून कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र मान्यता दिली आहे. त्यासोबतच या धर्माला अल्पसंख्यांकाचा दर्जा देत राज्य शासनाने केंद्राकडे मान्यतेसाठी शिफारसही केली आहे.
कर्नाटक सरकार प्रमाणे महाराष्ट्राने सुध्दा लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देवून अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्यासाठीची शिफारस केंद्राकडे करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी आ.अमरनाथ राजूरकर, जि.प.अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, डॉ़श्याम पाटील तेलंग, किशोर स्वामी, जि.प.सदस्य संजय बेळगे, विजय येवनकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, बालाजीराव पांडागळे आदी उपस्थित होते़
दरम्यान, लिंगायत समन्वय समितीच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ त्यात अ‍ॅड़अविनाश भोसीकर, दिलीप डांगे, डॉक़ुºहाडे, हरिहरराव भोसीकर, प्रा़आनंद कर्णे, सुभाशिष कामेवार, पिंटू बोंबले, रत्नाकर कुºहाडे, महेंद्र देमगुंडे, अविनाश मारकोळे, श्रीकांत गुंजकर,अनिल खानापूरकर, दिलीप डांगे, व्यंकटराव चांडोळकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Asserting independent Lingayat Dharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.