नागपुरातील तरुणाचा बडनेऱ्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:23 PM2019-04-24T22:23:56+5:302019-04-24T22:28:04+5:30

अमरावतीवरून रेल्वेने परत येत असलेल्या नागपुरातील एका युवकाचा खाली पडून मृत्यू झाला. सौरभ खोब्रागडे (३०) रा. वंजारी नगर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर घडली. या प्रकरणी बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली.

The youth of Nagpur died in dawn | नागपुरातील तरुणाचा बडनेऱ्यात मृत्यू

नागपुरातील तरुणाचा बडनेऱ्यात मृत्यू

Next
ठळक मुद्देरेल्वे आऊटरवर आढळला मृतावस्थेत मोबाईलवरून पटली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरावतीवरून रेल्वेने परत येत असलेल्या नागपुरातील एका युवकाचा खाली पडून मृत्यू झाला. सौरभ खोब्रागडे (३०) रा. वंजारी नगर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर घडली. या प्रकरणी बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली. अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार केले.
सौरभचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले. त्याला पत्नी सुकेशनी आणि दोन वर्षाची मुलगी अबोली आहे. तो आईवडिलांसह वंजारीनगरात राहात होता. मागील आठ दिवसांपूर्वीच तो अमरावतीला कामानिमित्त गेला होता. काम आटोपून मंगळवारी नागपूरला परत येत होता. सायंकाळच्या सुमारास सौरभ बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर कि.मी. ६६३/३४ जवळ मृतावस्थेत पडून होता. नागपूरला जाणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने या घटनेची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. त्यांच्याकडून लोहमार्ग पोलीसचे हेड कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सुरुवातीला त्याची ओळख पटली नाही. त्याच्या जवळ मिळालेल्या मोबाईलवरून ओळख पटली. कांबळे यांनी बंद असलेल्या मोबाईलला सुरू करून त्यातील नंबरवर संपर्क साधला तसेच या घटनेची माहिती दिली.
फोनवर सांगितले घरी येतोय
सौरभचे मामा सेवानिवृत्त माहिती अधिकारी नरेश मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार तो कामानिमित्त अमरावतीला गेला होता. सौरभने दुपारच्या सुमारास सुरेश मेश्राम (मामा) यांना फोन केला होता. रेल्वे तिकीट घेतले असून घरी येत असल्याचे तो म्हणाला. घरी सारेच त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातली.

Web Title: The youth of Nagpur died in dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.