नागपुरात भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:10 AM2018-02-15T00:10:49+5:302018-02-15T00:12:06+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा युवक काँग्रेसने बुधवारी निषेध केला. निषेध मोर्चा काढून विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ६४ पदाधिकाऱ्यांना अटक केली.

Youth Congress aggressive against Bhagwat in Nagpur | नागपुरात भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक 

नागपुरात भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक 

Next
ठळक मुद्देनिषेध मोर्चा काढला : ६४ कार्यकर्त्यांना अटक


लोकमत न्यूज नेटवर्क   
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सैन्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्याचा युवक काँग्रेसने बुधवारी निषेध केला. निषेध मोर्चा काढून विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ६४ पदाधिकाऱ्यांना अटक केली.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी व प्रदेश प्रभारी अमित यादव यांच्या उपस्थितीत चितारओळीतील गांधी पुतळ्यापासून निषेध मार्च काढण्यात आला. यापूर्वी संघाच्या रेशीमबाग येथील केशवद्वार पासून दुचाकी रॅली काढण्यात आली. ही रॅली राम कूलर चौक, गांधीगेट, अग्रसेन चौक मार्गे चितारओळीत पोहचली. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर रॅली कल्याणेश्वर मंदिर मार्गाने संघ मुख्यालयाकडे निघाली. यावेळी तहसील पोलिसांनी रॅलीला रोखले व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये सुशांत सहारे, नवेद शेख, अखिलेश राजन, आसिफ अन्सारी, स्वप्निल ढोके, जावेद शेख, अक्षय घाटोळे, बाबू खान, अक्षय हेटे, इमरान पला, अलोक कोंडापूरवार, मुज्जू शेख, विशाल वाघमारे, फजलूर कुरैशी, नागेश जुनघरे, सागर चव्हाण, हेमंत कातुरे, राकेश बैरीसाल, हर्षल हजारे, फरदीन खान, सुबोध सवाईतुल, मनोज हसोरिया, गुड्डु भाई, पूजक मदने, अभिजित पवार, नितीन गुरव, मनोज धकाते आदींचा समावेश होता. यावेळी, भागवत हे सैन्याची व देशाची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
संविधान चौकातही आंदोलन
 रामटेक लोकसभा युवक काँग्रेसतर्फे अध्यक्ष अनिल राय यांच्या नेतृत्वात संविधान चौकात कार्यकर्त्यांनी मुंडण करून मोहन भागवत यांचा निषेध केला. यावेळी राष्ट्रीय सचिव प्रतिभा रघुवंशी, अमित यादव, कुणाल राऊत, कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचा वाद होऊन धक्काबुक्कीही झाली. पोलिसांनी राय यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात तनवीर अहमद विद्रोही, अजित सिंह, अंदाज वाघमारे, नीरज लोणारे, धीरज पांडे, राकेश निकोसे, दिनेश यादव, परसराम मानवटकर, अमीर नूरी, अभिषेक सिंह, वैष्णवी भारद्वाज, सचिन किरपान, शशिकांत थोटे, अश्विन बैस, विष्णू कोकडे, आशिष मंडपे, सतीश पाली, रितेश काडे, अभिजित ठाकरे, सम्राट गजभिये, धीरज यादव, फिरोज अन्सारी, संदीप यादव, विजय कोंडुलवार, ललित वैरागडे, प्रशांत दशमवार आदी उपस्थित होते.

Web Title: Youth Congress aggressive against Bhagwat in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.