वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:51 AM2017-12-18T10:51:40+5:302017-12-18T10:52:03+5:30

तीन दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे.

World's Orange Festival concludes today; Discussion, singing and dance will be done by them | वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा आज समारोप; चर्चासत्र, गायन व नृत्याने होणार सांगता

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल देशपांडे, सोनाली कुलकर्णी व बेनी दयाल यांचे सादरीकरण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : तीन दिवस विविध उपक्रमांद्वारे संत्रा उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा सोमवारी समारोप होत आहे. १८ डिसेंबर रोजी महोत्सवाच्या अंतिम दिवशी सकाळी १०.३० ते १२ दरम्यान संत्रा उत्पादक आणि बँकर्स यांच्या भेटीचा (एसएलबीसी) कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते १ यावेळत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ‘संत्रा शेती : प्रक्रिया, विमा, व्यापार, कृषी पर्यटन, निर्यात आणि जाहिरात’ या मुख्य विषयावर तज्ज्ञ विचार मांडतील. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.ए. निंबाळकर हे परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी महा आॅरेंजचे चेअरमेन अनंत घारड, आॅरेंज ग्रोअर असोसिएशन आॅफ इंडिया (ओजीए) चे कार्यकारी अध्यक्ष अमोल तोते, एपीईडीएचे सहायक महाव्यस्थापक प्रशांत वाघमारे, फुड सिक्यूरिटी, अ‍ॅग्रीबिजनेस, पॉलिसी अ‍ॅन्ड प्रोजेक्ट, युपीएलचे उपाध्यक्ष आणि प्रमुख विजय सरदाना, ताज फ्रुट कंपनीचे संचालक ताज खान तसेच महाराष्ट्र  पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे सहभागी होतील.
दुपारी २.१५ ते २.३० या वेळेत भू विज्ञान मंत्रालयातर्फे सादरीकरण केले जाणार आहे. २.३० ते २.४५ ई-नाम (नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केट)तर्फे सादरीकरण होईल. दुपारी २.४५ वाजता ‘भारतातील संत्रा उद्योग’ या विषयावर सेमीनार आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता लुधियाना (पंजाब) येथील फळ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. एमआयएस गील हे ‘पंजाबमधील किननॉउ उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन करतील. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या उपसंचालिका डॉ. प्रगती गोखले या ‘मेरा मोबाईल मेरा मार्केट’ या विषयावर सादरीकरण करतील. याशिवाय स्विट आॅरेंज रिसर्च स्टेशन, बदनापूर जिल्हा जालनाचे प्रमुख डॉ. एम.बी. पाटील हे ‘महाराष्ट्रतील गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. एआयसीआरपी आॅन फ्रुट, संत्रावर्गीय संशोधन केंद्र, तिरुपती, आंध्रप्रदेशचे प्रमुख आणि प्रधान वैज्ञानिक डॉ. के. टी. व्यंकटरामन हे ‘आंध्रप्रदेशामध्ये गोड संत्रा लागवडीच्या अपेक्षा’ या विषयावर सादरीकरण करतील. यादरम्यान ‘नेह भागात खासी संत्रा लागवड’ या विषयावर मिझोरमच्या फलोत्पादन विभागाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे. ‘उत्कृष्ट लिंबुवर्गीय फळांच्या केंद्राची उपलब्धता’ या विषयावर फलोत्पादन विभाग प्रमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाच्या फलोत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एम. पंचभाई हे मार्गदर्शन करतील. शेवटी आयआयएचआर, बंगरूळूचे वैज्ञानिक डॉ. पी. त्रिपाठी हे ‘दक्षिण भारतातील कुर्ग संत्रा उद्योग’ या विषयावर सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय संदेशाद्वारे या महोत्सवाची सांगता होईल.

संत्र्याचे शहर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नागपुरात लोकमततर्फे आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टीव्हलचा भाग होणे होणे ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. ग्राहकांना आनंद आणि सकारात्मकता देणाऱ्या कलेला आम्ही नेहमीच प्रोत्साहित केले आहे. या एकमेव अशा महोत्सवातून ‘मास्टरपीस’ निर्माण करणारे नवीन कलावंत बाहेर पडतील आणि आॅरेंज फेस्टिव्हलला नेहमीसाठी संस्मरणीय करतील असा विश्वास आहे.
- कोकुयो कॅमलीन

Web Title: World's Orange Festival concludes today; Discussion, singing and dance will be done by them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.