नागपुरात नोटाबंदी विरोधात कामगार काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:47 PM2018-11-08T22:47:56+5:302018-11-08T22:48:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प्रदेश  कामगार काँग्रेसचे अध्यक्ष बदरुजमा यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात धरणे व निदर्शने करण्यात आली.

Workers' Congress demonstrations against demonetization in Nagpur | नागपुरात नोटाबंदी विरोधात कामगार काँग्रेसची निदर्शने

नागपुरात नोटाबंदी विरोधात कामगार काँग्रेसची निदर्शने

Next
ठळक मुद्देसंविधान चौकात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प्रदेश  कामगार काँग्रेसचे अध्यक्ष बदरुजमा यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात धरणे व निदर्शने करण्यात आली.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसला. त्यांना अनेक संकटांना सामोेरे जावे लागल्याने भाजपाने कामगार वर्गाची माफी मागावी, अशी मागणी कामगार काँग्रेसचे अध्यक्ष युगल विदावत यांनी यावेळी केली. यावेळी कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद, निलीमा दुपारे, व पश्चिम नागपूरचे अध्यक्ष गुड्डू नेताम आदींनी विचार व्यक्त केले. आभार दीपक शिवणकर यांनी मानले. यावेळी तौसिफ शेख, उमेश वर्मा, सचिन तिवारी, सौरव मलाकवदे, शाहनवाज खान, सोनू सूर्यवंशी, कमल ठाकूर, वसीम खान, मोरू मेंढे यांच्यासह कामगार काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Workers' Congress demonstrations against demonetization in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.