न्यायालयात पत्नीवर हल्ला

By Admin | Published: April 7, 2016 02:57 AM2016-04-07T02:57:54+5:302016-04-07T02:57:54+5:30

खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराने न्यायालयात पेशीदरम्यान पत्नी आणि पोलीस हवालदारावर खुनी हल्ला केला.

Wife attacked in court | न्यायालयात पत्नीवर हल्ला

न्यायालयात पत्नीवर हल्ला

googlenewsNext

खुनाच्या आरोपीचे कृत्य : हवालदारावरही केला वार
नागपूर : खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या एका गुन्हेगाराने न्यायालयात पेशीदरम्यान पत्नी आणि पोलीस हवालदारावर खुनी हल्ला केला. जिल्हा न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हुडको कॉलनी निवासी ३० वर्षीय संदेश ऊर्फ गोलू नाईक याने साथीदारांच्या मदतीने रूपेश ऊर्फ पप्पू काळे याचा १४ जानेवारी २०१४ रोजी खून केला होता. जरीपटका पोलिसांनी खुनाच्या आरोपात गोलूला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे. पत्नी स्नेहा त्याला भेटण्यासाठी तुरुंगात जात होती. एक आठवड्यापूर्वी सुद्धा ती तुरुंगात भेटायला गेली होती. तेव्हा सुद्धा तो तिच्याशी व्यवस्थित बोलला नव्हता. मंगळवारी गोलूची न्यायालयात पेशी होती. तेव्हा स्नेहा चार वर्षाच्या मुलाला घेऊन त्याला भेटायला न्यायालयात आली होती. बुधवारी ती पुन्हा एकटीच गोलूला भेटायला आली होती. हवालदार देवेंद्र नगराळेसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गोलूला तुरुंगातून न्यायालयात आणले होते. दुपारी १२.३० वाजता गोलू सत्र न्यायाधीश ए.वी. दीक्षित यांच्या न्यायालयाबाहेर स्नेहा गोलूला भेटली. पती-पत्नी बोलत असल्याने पोलीस थोड्या बाजूला उभे झाले. सुरुवातीला गोलूने स्नेहासोबत सामान्यपणे चर्चा केली. परंतु अचानक तो तिच्यावर आरोप करू लागला. शिखातून चाकूसारखी लोखंडी पट्टी काढली आणि तिच्यावर वार करू लागला. प्रत्यक्षदर्शीनुसार तिच्या गळ्यावर केलेला पहिला वार चुकल्याने गोलूने दुसरा वार केला. तो तिच्या नाकाला लागला. दरम्यान आरडाओरड झाल्याने हवालदार देवेंद्र नगराळे व त्यांचे साथीदार धावले. त्यांनी गोलुला पकडण्याचा प्रयत्न केला. गोलूने देवेंद्रवरही हल्ला केला. देवेंद्रने साथीदारांच्या मदतीने गोलूवर नियंत्रण मिळविले.त्याला न्यायालयात सादर केल्यानंतर पोलीस चमू सदर ठाण्यात पोहचली.(प्रतिनिधी)

तुरुंगातूनच आणला होता चाकू
या घटनेमुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोलूने चाकूसारख्या लोखंडी पातीचा उपयोग केला होता. लोखंडी पातीला धारदार करून चाकू तयार केला होता. असे शस्त्र तयार करायला वेळ लागतो. गोलूची मंगळवारी पत्नीसोबत भेट झाली होती. ती बुधवारी पुन्हा येईल, याची त्याला माहिती होती. अशा परिस्थितीत तुरुंगातूनच त्याने चाकू आपल्या सोबत आणण्याची शंका आहे.

Web Title: Wife attacked in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.