विदर्भाला भरली हुडहुडी; गोंदिया सर्वांत गार, पारा ८.८ डिग्रीवर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 10:21 AM2022-12-10T10:21:41+5:302022-12-10T10:24:40+5:30

नागपूर प्रथमच १० अंशाखाली

Vidarbha witnessing cold wave, Gondia coldest; mercury dropped to 8.8 degrees | विदर्भाला भरली हुडहुडी; गोंदिया सर्वांत गार, पारा ८.८ डिग्रीवर घसरला

विदर्भाला भरली हुडहुडी; गोंदिया सर्वांत गार, पारा ८.८ डिग्रीवर घसरला

googlenewsNext

नागपूर : उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्याने नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत परिणाम दिसून येतोय. विदर्भात शुक्रवारी गोंदिया जिल्हा सर्वांत गार होता. येथील तापमान ८.८ डिग्री नोंदविण्यात आले, तर नागपुरातही या मोसमात पारा पहिल्यांदा १० डिग्री खाली पोहोचला. नागपुरात किमान तापमानाची नोंद ९.९ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. येणारे दोन-तीन दिवस वातावरणात गारठा राहणार आहे.

हवामान विभागानुसार वातावरणात कोरडेपणा वाढला असून, पाराही घसरत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आद्रतेचे प्रमाण झपाट्याने खाली येत आहे. गार वारेही वेगाने वाहत आहे. गेल्या २४ तासांत अकोल्यात सर्वाधित ३.७ डिग्री सेल्सिअस तापमान घसरले. येथे तापमान ११.३ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. ब्रह्मपुरीमध्ये सायंकाळी आद्रता ५४ टक्के होती, तर उर्वरित जिल्ह्यात आद्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने तापमानात घट दिसून येत आहे.

जिल्हा - तापमान

  • गोंदिया - ८.८
  • नागपूर - ९.९
  • यवतमाळ - १०.५
  • बुलढाणा - ११
  • वर्धा - ११
  • अकोला - ११.३
  • ब्रह्मपुरी - ११.३
  • अमरावती - ११.४
  • चंद्रपूर - १२
  • गडचिरोली - १२.४
  • वाशिम - १३.२

Web Title: Vidarbha witnessing cold wave, Gondia coldest; mercury dropped to 8.8 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.