नागपूर : शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा घोळ अद्याप कायम असून, विदर्भातील आठ जिल्ह्यांत अद्याप एकाही शेतक-यांचा खात्यात एक छदामही टाकण्यात आलेला नाही. यवतमाळात कोडवर्ड चुकल्याने गत महिन्यात पैसे परत गेले होते, तर नागपूर जिल्ह्यात नेमका किती जणांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, हेच अधिका-यांना ठाऊक नाही. इतकेच नव्हे, तर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन ज्यांचा गौरव करण्यात आला होता, त्यांचेही कर्ज अद्याप माफ करण्यात आलेले नाही.
नागपूर जिल्ह्यात एकूण एक लाख सात हजार लोकांनी कर्जमाफी योजनेंतर्गत अर्ज केलेले आहेत. यापैकी काही नावे पुन्हा-पुन्हा आली असल्याने, ती बाद होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांची पहिली यादी (ग्रीन लिस्ट) जाहीर करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी पात्र ठरले. कोडवर्ड चुकल्याने गत महिन्यात पैसे परत गेले होते. पात्र शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी दोन हजार कोटी रुपये हवे आहेत, परंतु विविध निकषांमुळे अद्यापपर्यंत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जे शेतकरी ग्रीन लिस्टमध्ये आले. त्यांच्यासाठी दोन दिवसांपूर्वी १४ कोटी ३० लाख रुपये बँकेकडे आले आहे.
आदिवासी गडचिरोली गोंधळ
गडचिरोली जिल्ह्यात १,३९० शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये टाकण्यात आली असली, तरी मागाहून केलेल्या चावडी वाचनात त्या नावांवरही आक्षेप आल्यामुळे त्यांची पुनर्पडताळणी सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोणालाही कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ झालेला नाही.
>भंडारा जिल्ह्यात अद्याप एकाही शेतकºयांच्या खात्यातील पैसे कमी झाले नाहीत. किंवा ज्यांनी कर्ज भरले आहे त्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ग्रीन लिस्टमधील २,२०८ लाभार्थ्यांमध्ये १,४०२ लाभार्थी राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेशी, तर ८०६ लाभार्थी जिल्हा बँकेशी निगडित आहे.
गोंदिया जिल्ह्यात ग्रीन यादीतील २,८४८ शेतकºयांची नावे जिल्हा आणि राष्टÑीयकृत बँकांकडे पाठविली आहेत. मात्र, यापैकी अद्यापही एकाही शेतकºयाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही.
शासनाकडून जिल्हा बँकेला १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रुपये व राष्टÑीयकृत बँकांना १० लाख ३३ हजार २९९ रुपयांचा निधी ग्रीन यादीतील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्राप्त झाल्याचे बँकेच्या अधिकाºयांनी सांगितले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ग्रीन यादी अद्याप तयार झालेली नाही.