भलतंच! ‘कुठे चाललात’ असे विचारले म्हणून बायको-साळीने तरुणाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2023 10:52 PM2023-06-02T22:52:33+5:302023-06-02T22:53:46+5:30

Nagpur News कुठलीही माहिती न देता घराबाहेर कुठे जात आहात असे बायको व साळीला विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या मुद्यावरून बायकोने जोरदार वाद घातला तर साळीने घरातील लाटण्याने त्याचे डोकेच फोडले.

Very well! The wife-in-law hit the young man's head as he asked 'where are you going' | भलतंच! ‘कुठे चाललात’ असे विचारले म्हणून बायको-साळीने तरुणाचे डोके फोडले

भलतंच! ‘कुठे चाललात’ असे विचारले म्हणून बायको-साळीने तरुणाचे डोके फोडले

googlenewsNext

नागपूर : कुठलीही माहिती न देता घराबाहेर कुठे जात आहात असे बायको व साळीला विचारणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या मुद्यावरून बायकोने जोरदार वाद घातला तर साळीने घरातील लाटण्याने त्याचे डोकेच फोडले. लहानशा कारणावरून सुरू झालेला हा वाद अखेर पोलिस ठाण्यात पोहोचला. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आशिष विनोद मंडल (२२, महाकालीनगर झोपडपट्टी), असे जखमी तरुणाचे नाव आहे. पंधरा दिवसांअगोदर आशिषचा पत्नी पूजासोबत वाद झाला होता व त्यामुळे ती माहेरी गेली होती. गुरुवारी रात्री आशिष मुलांना भेटण्यासाठी सासरी गेला होता. त्यामुळे पूजा व तिची बहीण राणी या दोघी बाहेर जात होत्या. तुम्ही कुठे जात आहात, असे आशिषने विचारले असता दोघीही संतापल्या. आम्ही काय तुला विचारून बाहेर जायला पाहिजे का, असे म्हणत पूजाने वाद घालण्यास सुरुवात केली, तर राणीने घरातून लाटणे आणत ते आशिषच्या डोक्यावरच मारले. रक्तबंबाळ अवस्थेतच आशिष बेलतरोडी पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी त्याला मेडिकल इस्पितळात नेले. त्याच्या तक्रारीवरून त्याच्या बायको व साळीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Very well! The wife-in-law hit the young man's head as he asked 'where are you going'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.