नागपूर विद्यापीठाचा ब्रिटिशकालीन परंपरेला छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 08:22 PM2018-09-27T20:22:33+5:302018-09-27T20:26:59+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. या दीक्षांत समारंभापासून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ‘व्हीएनआयटी’नेदेखील असाच निर्णय घेतला होता. त्यांच्याच पावलावर विद्यापीठानेदेखील पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या विषयाबाबत गुरुवारीच वृत्त प्रकाशित केले होते.

The University of Nagpur has broken the British tradition | नागपूर विद्यापीठाचा ब्रिटिशकालीन परंपरेला छेद

नागपूर विद्यापीठाचा ब्रिटिशकालीन परंपरेला छेद

Next
ठळक मुद्दे१०६ वा दीक्षांत समारंभ ठरणार ऐतिहासिक : ‘गाऊन’ची परंपरा यंदापासून होणार बंदप्रभाव ‘लोकमत’चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०६ वा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. या दीक्षांत समारंभापासून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ‘व्हीएनआयटी’नेदेखील असाच निर्णय घेतला होता. त्यांच्याच पावलावर विद्यापीठानेदेखील पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने या विषयाबाबत गुरुवारीच वृत्त प्रकाशित केले होते.
नागपूर विद्यापीठाच्या १०६ व्या दीक्षांत समारंभाच्या आयोजनाबाबत गुरुवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक झाली. या बैठकीत दीक्षांत समारंभाच्या आयोजनाची तारीख, अतिथींची संभाव्य नावे इत्यादींवर सविस्तर चर्चा झाली. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचा उल्लेख करत दीक्षांत समारंभातून ‘गाऊन’ची ‘ब्रिटिश’कालीन परंपरा हद्दपार करण्यात यावी, अशी मागणी केली. काही वर्षांआधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ‘कॅप’ व ‘गाऊन’ची प्रथा बंद केली होती. मात्र मंचावरील मुख्य अतिथी, अधिकारी तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य मात्र ‘गाऊन’ परिधान करुन असतात. ही प्रथा बंद झाली तर एक चांगला संदेश समाजात जाईल, अशी भूमिका विष्णू चांगदे यांनी मांडली. व्यवस्थापन परिषदेतील इतर सदस्यांनीदेखील या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर संबंधित निर्णय एकमताने पारित करण्यात आला.

पोशाखात ‘जोधपुरी’ व पंचाचा समावेश
विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अधिकारी व प्राधिकरण सदस्य साधारणत: ‘ब्लेझर’ किंवा ‘सफारी सूट’ व ‘गाऊन’ अशा पेहरावात असायचे. मात्र आता ‘गाऊन’ बंद करत असताना दीक्षांत समारंभाला आणखी समाजमान्य बनविण्यासाठी भारतीय पोशाख असावा अशी सूचनादेखील मांडण्यात आली. त्यानुसार ‘जोधपुरी’ व पंचा असा पोशाख राहणार आहे.

टाटांसह गडकरींना बोलविण्याची मागणी
दरम्यान दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी कोण असेल यावरदेखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. उद्योगपती रतन टाटा किंवा मुकेश अंबानी यांना बोलविण्याचा मानस असल्याचे कुलगुरूंनी यावेळी सांगितले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनादेखील यावेळी विशेष अतिथी म्हणून बोलविण्यात यावे, अशी मागणी काही प्राधिकरण सदस्यांनी केली. प्रशासनाने ही मागणी मान्य केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The University of Nagpur has broken the British tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.