ठळक मुद्देओळखपत्रावरून पटली ओळखआत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात

नागपूर : शुक्र वारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनिषा पटले (वय १७) आणि आशना रोकडे (वय १७) अशी मृत मुलींची नावे आहेत.
मनिषा आणि आशना या दोघीही जरीपटक्यातील लहानुजीनगरात राहत होत्या. त्या दयानंद महाविद्यालयात ११ वीत शिकायच्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या महाविद्यालयात जात आहोत, असे सांगून घरून निघाल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरू केली. ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पालकांनी जरीपटका ठाण्यात तक्र ार नोंदवली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, शनिवारी सकाळी १० च्या सुमारास कोराडी तलावात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. कोराडी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपासणी केली असता महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्या बेपत्ता असल्याची तक्र ारही जरीपटका ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर पालकांकडून ओळख पटविण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर मुलींचे मृतदेह मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.