नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 01:09 AM2019-01-03T01:09:45+5:302019-01-03T01:11:16+5:30

काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले.

The truck collapsed in Nagpur and the boy was crushed | नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले

नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले

Next
ठळक मुद्दे जड वाहनांवर नियंत्रण आणावे : नागरिकांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले.
दहा वर्षीय मृत मुलाचे नाव नैतिक करताल सनोडिया असून, तो भांडेवाडी पारडी येथील रहिवासी होता. जखमींमध्ये राकेश सनोडिया (२४) आणि दुग्गु सनोडिया (४) यांचा समावेश आहे. राकेश मंगळवारी रात्री दोन पुतण्यांसह सोनबानगर येथे आयोजित जन्मदिवसाच्या पार्टीत गेले होते. पार्टीनंतर तिघे रात्री १०.३० वाजता दुचाकीवरून घरी परत येत होते. पारडी बाजार पुलाजवळ पाठीमागून येणारा ट्रक क्र. ए.पी./२५/यू/६०३५ च्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली. तिघेही खाली पडले. ट्रकचे चाक नैतिकच्या डाव्या पायावरून गेले. तिघांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे नैतिक मृत पावला. या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सांगितले की, या मार्गावर जड वाहनांमुळे निरंतर अपघात होतात. जड वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. नैतिक चौथ्या वर्गात होता. त्याचे वडील ट्रकचालक आहेत. या घटनेत भाऊ आणि काका बचावले. कळमना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title: The truck collapsed in Nagpur and the boy was crushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.