शेजारच्यांशी भांडण झाल्याने ट्रान्सपोर्टरचे कुटुंब लॉकअपमध्ये, घरी १६.७४ लाखांची घरफोडी

By योगेश पांडे | Published: March 23, 2024 04:02 PM2024-03-23T16:02:24+5:302024-03-23T16:02:47+5:30

त्रिपाठीचा शेजारच्यांशी वाद झाला होता व प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. १८ मार्च रोजी पोलिसांनी अरुणकुमार व मुलाला अटक केली.

Transporter's family in lockup due to quarrel with neighbours, home burglary worth 16.74 lakhs | शेजारच्यांशी भांडण झाल्याने ट्रान्सपोर्टरचे कुटुंब लॉकअपमध्ये, घरी १६.७४ लाखांची घरफोडी

शेजारच्यांशी भांडण झाल्याने ट्रान्सपोर्टरचे कुटुंब लॉकअपमध्ये, घरी १६.७४ लाखांची घरफोडी

नागपूर : शेजारच्याशी भांडण झाल्याने पोलिसांच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका ट्रान्सपोर्टरकडे चोरट्यांनी घरफोडी केली व १६.७४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी (५२, वसंत विहार, खडगाव रोड, वाडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्रिपाठीचा शेजारच्यांशी वाद झाला होता व प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. १८ मार्च रोजी पोलिसांनी अरुणकुमार व मुलाला अटक केली. तर पत्नी व मुलगी घरी परतले. त्याच प्रकरणासाठी पत्नी व मुलगी घराला कुलूप लावून दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली व न्यायालयातून जामीन न मिळाल्याने त्यांची नागपूर कारागृहात रवानगी झाली. २१ मार्च रोजी त्यांना जामीन मिळाला व सायंकाळी सर्व जण घरी पोहोचले. त्यावेळी बाहेर लोकांची गर्दी होती व पोलीसदेखील होते. त्रिपाठी कुटुंबीय कारागृहात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले व त्यांच्या कपाटातील दागिने तसेच रोख असा १६.७४ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. त्रिपाठीच्या तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Transporter's family in lockup due to quarrel with neighbours, home burglary worth 16.74 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.