नागपुरातून एकूण २६ तर रामटेकमधून २४ जणांनी भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:22 AM2019-03-26T01:22:55+5:302019-03-26T01:26:47+5:30

लोकसभेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांच्याह २६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अगोदर ९ जणांनी अर्ज सादर केले हाते. तर रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण पाटणकर यांच्यासह एकूण २४ जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले. यापूर्वी दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे.

In total 26 candidates from Nagpur and 24 from Ramtek filled the nomination | नागपुरातून एकूण २६ तर रामटेकमधून २४ जणांनी भरले अर्ज

नागपुरातून एकूण २६ तर रामटेकमधून २४ जणांनी भरले अर्ज

Next
ठळक मुद्देशेवटच्या दिवशी धावपळभाजप-सेना गडकरी-तुमाने, काँग्रेस-पटोले- गजभिये, बसपा- मो. जमाल-गजभिये, वंचित बहुजन आघाडी-डबरासे- पाटणकर यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी नागपूरमधून भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे नाना पटोले, बसपाचे मो. जमाल, वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांच्याह २६ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले. अगोदर ९ जणांनी अर्ज सादर केले हाते. तर रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने, काँग्रेसचे किशोर गजभिये, बसपाचे सुभाष गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीचे किरण पाटणकर यांच्यासह एकूण २४ जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले. यापूर्वी दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे.
दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घेण्यात आले. शेवटच्या दिवशी मेठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज सादर केल्याने निवडणूक प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

नागपूर लोकसभा

नितीन गडकरी (भाजप)
नाना पटोले (काँग्रेस)
मो. जमाल (बसपा)
सागर डबरासे (भारिप- वंचित बहुजन आघाडी)
साहिल ठाकूर (भारतीय मनवाधिकार)
गोपालकुमार कश्यप (छत्तीसगड स्वाभिमान मंच)
डॉ. मनीषा बांगर (पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक)
विठ्ठल गायकवाड (हम)
विनोद बडोले (अ.भा.सर्वधर्म समाज)
उदय बोरकर (अपक्ष)
दीक्षिता टेंभुर्णे (देश जनहित पार्टी)
सुनील कवाडे (अपक्ष)
पल्लवी नंदेश्वर (पीपल पार्टी ऑफ इंडिया)
सचिन पाटील (अपक्ष)
नीलेश ढोके (अपक्ष)
श्रीधर साळवे (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी)
सिद्धार्थ कुर्वे (भारतीय दलित पँथर)
सचिन सोमकुंवर (अपक्ष)

रामटेक लोकसभा

कृपाल तुमाने (शिवसेना)
किशोर गजभिये (काँग्रेस)
सुभाष गजभिये (बसपा)
किरण पाटणकर (वंचित बहुजन आघाडी)
शैलेश जनबंधू (सोशलिस्ट युनिटी)
अर्चना उके (राष्ट्रीय जनसंभावना पार्टी)
लक्ष्मण कानेकर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)
विनोद पाटील (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया)
सचिन शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया)
गजानन जांभुळकर (अपक्ष)
सोनाली बागडे (अपक्ष) अनिल ढोणे (अपक्ष)

 

Web Title: In total 26 candidates from Nagpur and 24 from Ramtek filled the nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.