आरडीएसओच्या परीक्षणापूर्वी आज ‘माझी मेट्रो’रुळावर धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:50 PM2019-02-13T23:50:52+5:302019-02-13T23:53:22+5:30

महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इंजिनद्वारे रुळाची पाहणी केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. गुरुवारी रात्री महामेट्रोतर्फे मेट्रोचा ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार असून ‘माझी मेट्रो’ रुळावर धावताना दिसणार आहे.

Today will be run 'Mazi Metro' before the RDSO trial | आरडीएसओच्या परीक्षणापूर्वी आज ‘माझी मेट्रो’रुळावर धावणार 

आरडीएसओच्या परीक्षणापूर्वी आज ‘माझी मेट्रो’रुळावर धावणार 

Next
ठळक मुद्दे दीक्षित यांच्यातर्फे बुलंद शंटिंग इंजिनद्वारे ‘सेफ्टी रन’ : आरडीएसओची चमू १६ ला येणार

लोकमत  न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोनागपूरमेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इंजिनद्वारे रुळाची पाहणी केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. गुरुवारी रात्री महामेट्रोतर्फे मेट्रोचा ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार असून ‘माझी मेट्रो’ रुळावर धावताना दिसणार आहे.
बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेच्या ‘सेफ्टी रन’साठी आवश्यक तयारी केली आहे. त्यामध्ये ट्रॅक, ओव्हर हेड इलेक्ट्रिफिकेशन, स्टेशन आणि संबंधित कामांचा आरडीएसओतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता २५ हजार व्हॉल्ट विजेचा प्रवाह सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हाया डक्ट विभागात सुरक्षेच्या कारणांनी सर्व कामे थांबविण्यात आली आहेत. बुधवारी वर्धा रोडवर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते जयप्रकाश मेट्रो स्टेशनपर्यंत दोन कि़मी. ट्रॅकवर बुलंद शंटिंग इंजिनने सेफ्टी रनचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग, महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरडीएसओ चमूचे परीक्षण १६ ला
नागपूर मेट्रो प्रकल्पात व्हाया डक्ट विभागात (मेट्रो पूल) चीन येथून आलेली मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी आरडीएसओची चमू सुरक्षा मानकानुसार काम झाले वा नाही, याच्या परीक्षणासाठी १६ फेब्रुवारीला येणार आहे. मेट्रो पूलावर रेल्वे चालवून सर्व तांत्रिक बाबींचे परीक्षण करतील.
१२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत
बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, निर्धारित वेळेत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ४५० ते ५०० कर्मचारी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर कार्यरत आहे. कुशल कारागिरांच्या मदतीने कमी वेळेत एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल.

Web Title: Today will be run 'Mazi Metro' before the RDSO trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.