विधानसभेच्या माजी सदस्यांच्या निधनाच्या तब्बल तीन वर्षानंतर मांडला शोकप्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:08 PM2017-12-11T20:08:45+5:302017-12-11T20:10:05+5:30

विधानसभेचे माजी सदस्य रामभाऊ तुपे यांच्या निधनाबद्दल त्यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोकप्रस्ताव मांडला होता. दरम्यान विधानसभा सदस्याच्या निधनानंतर तब्बल तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव मांडला जात असल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

Three years after the anniversary of the death of ex-members of the Assembly, Mandla mourned the proposal | विधानसभेच्या माजी सदस्यांच्या निधनाच्या तब्बल तीन वर्षानंतर मांडला शोकप्रस्ताव

विधानसभेच्या माजी सदस्यांच्या निधनाच्या तब्बल तीन वर्षानंतर मांडला शोकप्रस्ताव

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी आणले निदर्शनासअध्यक्षांनी दिले चौकशीचे आदेश

आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधानसभेचे माजी सदस्य रामभाऊ तुपे यांच्या निधनाबद्दल त्यांना सोमवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शोकप्रस्ताव मांडला होता. दरम्यान विधानसभा सदस्याच्या निधनानंतर तब्बल तीन वर्षानंतर शोकप्रस्ताव मांडला जात असल्याची बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे असे होऊ नये म्हणून सदस्याच्या निधनानंतर १५ दिवसाच्या आत शासकीय प्रतिनिधीने संबंधितांच्या घरी जाऊन शासनाच्या वतीने शोक संवेदना व्यक्त करावी, जेणेकरून त्यांना शोकप्रस्ताव पाठविण्याची आठवण राहील, असे सांगितले.
रामभाऊ तुपे यांचे निधन १६ आॅक्टोबर २०१४ रोजी झाले होते. परंतु त्यांच्या निधनाबाबतचा शोक प्रस्ताव तीन वर्षानंतर म्हणजे सोमवारी सभागृहात मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडत असताना स्वत: मुख्यमंत्र्यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली व भविष्यात असे होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सदस्य अजित पवार, गणपतराव देशमुख, भास्कर जाधव, स्मिता कोल्हे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
तसेच राज्याचे माजी मंत्री गोविंदराव सरनायक, विधानसभेचे माजी सदस्य राजीव राजळे, संपतराव पाटील, मुसा अली मोडक, डॉ. शंकरराव बोबडे, डॉ. कुसुमताई कोरपे या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Three years after the anniversary of the death of ex-members of the Assembly, Mandla mourned the proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार