आरोग्य सेवेत सेवाभावी संस्थांचे सहकार्य हवे

By admin | Published: November 29, 2015 03:58 AM2015-11-29T03:58:39+5:302015-11-29T03:58:39+5:30

आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

There should be co-operation with the charitable organizations in the health service | आरोग्य सेवेत सेवाभावी संस्थांचे सहकार्य हवे

आरोग्य सेवेत सेवाभावी संस्थांचे सहकार्य हवे

Next

खापरी येथे डायलिसिस सेंटरचे लोकार्पण : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर : आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन व रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या लद्धड डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता होते. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनतर्फे सुरू करण्यात आलेले डायलिसिस सेंटर सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून देत आहे. या मिशनमध्ये रुग्णांवर विविध प्रकाराच्या शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. हे सेवा कार्य आहे. या सेवा कार्यात संपन्न असलेल्या व्यक्तींनी सामाजिक भावनेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
रुग्णांवर उपचार होतांना परिवाराला मानसिक व आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत माफक दरात डायलिसिस सारखे उपचार मिळाले तर मोठा दिलासा रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतो. समाजात माफक दरात डायलिसिस उपचार उपलब्ध करून देणारी केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात डॉ. दिलीप गुप्ता यांनी सांगितले, राजीव गांधी जीवनदायी योजना या मिशनतर्फे राबविण्यात येते. हे हॉस्पिटल समाज संस्था आणि सरकार या तिघांच्या सहकार्याने चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राहुल लद्धड यांनीही अपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निमिष, सुनील, जीवनलाल, महेश, सतीश, हेमंत या लद्धड बंधूंचा तसेच रोटरी ईस्ट एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन, प्रॉव्हिन्शियल आॅटोमोबाईल्स, अंकुर सीड्स, सत्यनारायण नुवाल, अमित पंचमतिया, ब्रह्मोस एरो स्पेस, स्टेट बँक आॅफ इंडिया, रोटरी ईशान्य या व्यक्ती व संस्थांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुभाष लाघोटी, डॉ. प्रशांत ओंकार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: There should be co-operation with the charitable organizations in the health service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.