खरंच बँकेत पैसे असतात का सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:20 AM2019-06-06T11:20:43+5:302019-06-06T11:24:18+5:30

वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सरकार राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचे आवाहन करते. पण राष्ट्रीयकृत बॅँकेतही फसवणुकीच्या घटना घडत आहे. दर्शन कॉलनी येथील रहिवासी वानखेडे दाम्पत्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार रुपयांचा परस्पर व्यवहार झाला आहे.

Is there really money safe in the bank? | खरंच बँकेत पैसे असतात का सुरक्षित?

खरंच बँकेत पैसे असतात का सुरक्षित?

googlenewsNext
ठळक मुद्देवानखेडे दाम्पत्याच्या खात्यातून काढली लाखावर रक्कममहिनाभरानंतरही आरोपी फरारच, पैसेही गेले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे सरकार राष्ट्रीयकृत बँकेत पैसे ठेवण्याचे आवाहन करते. पण राष्ट्रीयकृत बॅँकेतही फसवणुकीच्या घटना घडत आहे. दर्शन कॉलनी येथील रहिवासी वानखेडे दाम्पत्यांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार रुपयांचा परस्पर व्यवहार झाला आहे. खात्यातून गेलेले पैसे परत मिळण्यासाठी दोघेही पतीपत्नी पोलीस स्टेशन, सायबर सेल, बँकेत चकरा मारत आहे. तक्रार देऊन महिना लोटल्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही.
छाया आणि प्रदीप वानखेडे यांचे वर्धमाननगरच्या एसबीआयच्या शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यातून ३० डिसेंबर २०१८ रोजी १ लाख २१ हजार व ३१ डिसेंबर २०१८ रोजी ११ हजार रुपये एटीएम व आॅनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. वानखेडे हे महत्त्वाच्या कामासाठी या पैशाचा वापर करतात. त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. पण ३ मे २०१९ रोजी त्यांच्या खात्यात १ लाख २० हजार रुपये जमा झाले आणि त्याच दिवशी एटीएम व आॅनलाईन ट्रान्सफरद्वारे काढूनही घेतले. ही बाब बॅँकेच्या लक्षात आल्यानंतर बॅँक मॅनेजर यांनी ६ मे रोजी वानखेडे यांच्याशी संपर्क साधला आणि विचारणा केली. तेव्हा ही धक्कादायक बाब त्यांना महिती पडली. त्यांनी लगेच लकडगंज पोलीस स्टेशन व सायबर सेलकडे तक्रार केली. ८ मे रोजी बँकेने त्यांच्याकडून डिस्प्युट फॉर्म भरून घेतला. पैसे परत मिळेल असा विश्वास बँकेने दिला. पण त्यासाठी लकडगंज पोलीस स्टेशनमधून एफआयआरची कॉपी आणायला सांगितली. पण लकडगंज पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येईल, असे सांगितले. लकडगंज पोलिसांनी केलेल्या चौकशीत घटना गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याचे वानखेडे यांना सांगितले. त्यामुळे वानखेडे यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. पण येथे बँकेचे प्रकरण हाताळणारे कर्मचारी दीर्घ रजेवर गेल्याचे सांगितले. त्यामुळे आज महिनाभरापासून दोघेही पतीपत्नी एफआयआरची प्रत घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे.

लगेच चौकशी केली असती तर आरोपी सापडला असता
३ मे रोजी त्यांच्या खात्यात १ लाख २० हजार रुपये आले आणि काढूनही घेतले. काढताना सीए रोडवरील एटीएमचा वापर करण्यात आला. वानखेडे दाम्पत्यांनी ६ मे रोजी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच तपास केला असता, एटीएमवरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असते, तर आरोपी सापडला असता, अशी अपेक्षा दाम्पत्यांनी व्यक्त केली. आता या घटनेला महिना लोटला आहे. पोलीस ठाण्यातून एफआयआर कॉपी सुद्धा उपलब्ध करून दिली जात नाही. बँक एफआयआरच्या कॉपीसाठी अडून बसली आहे. हा प्रकार सामान्य माणसाची अडवणूक करणारा असल्याची खंत या दाम्पत्यांनी व्यक्त केली.

Web Title: Is there really money safe in the bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक