नागपुरातील स्मार्ट शहर वाहतुकीसाठी ‘टीएफएल’ची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:07 PM2019-05-15T12:07:13+5:302019-05-15T12:08:21+5:30

लंडनमधील सार्वजनिक वाहतूक जगभरात सर्वोंत्तम मानली जाते. एमओयूबेटीव्हन ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या सहकार्याने भारतातील वाहतूक यंत्रणा सक्षम केली जाणार आहे.

TFL support for smart city traffic in Nagpur | नागपुरातील स्मार्ट शहर वाहतुकीसाठी ‘टीएफएल’ची मदत

नागपुरातील स्मार्ट शहर वाहतुकीसाठी ‘टीएफएल’ची मदत

Next
ठळक मुद्देव्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद पुढील महिन्यात लंडनचे शिष्टमंडळ नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लंडनमधील सार्वजनिक वाहतूक जगभरात सर्वोंत्तम मानली जाते. एमओयूबेटीव्हन ट्रान्सपोर्ट फॉर लंडन (टीएफएल) यांच्या सहकार्याने भारतातील वाहतूक यंत्रणा सक्षम केली जाणार आहे. यासाठी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने टीएफएल यांच्याशी करार केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात भारतातील पाच शहरात पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे.
यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर तसेच आंध्र प्रदेशातील विजयवाडा आदी शहरांचा समावेश आहे. सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील अडचणी व उपाययोजनांचे आदानप्रदान करण्याच्या हेतूने सोमवारी टीएफएल व महापालिके च्या परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
जूनच्या पहिल्या आठवड्यात टीएफएलचे शिष्टमंडळ नागपूर दौºयावर येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या गतिशीलता आणि कार्यक्षमतेवर तसेच नियोजन व वितरण यासारख्या लॉजिस्टिकल समस्यांवरील उपाययोजनासंदर्भात संवाद साधण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.
परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नांनी नागपूर शहरात तेजस्विनी बसेस लवकरच धावणार आहेत. या बसेस सौर ऊर्जेवर चालविण्याचा महापालिकेचा विचार असल्याची माहिती संवादादरम्यान देण्यात आली. या नाविन्यपूर्ण कल्पनेची प्रशंसा करण्यात आली.
परिवहन यंत्रणा राबविताना येणाºया अडचणी, त्यावरील उपाययोजना यासंदर्भात एक प्रश्नावली टीएफएलने दिली होती. त्यानुसार परिवहन विभागाने उत्तरांचा डेटा मांडला.
पायाभूत सुविधा, विना तिकीट प्रवासी, तिकीट व पासेसपासून मिळणारा महसूल, वित्त पुरवठा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिवहन विभागातर्फे वीरमाता, दिव्यांग, माजी सैनिकांना दिली जाणारी सवलत याचे स्वागत करण्यात आले.

Web Title: TFL support for smart city traffic in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.