अतिक्रमण हटविण्यावरून नागपुरातील हसनबागमध्ये तणाव , पोलिसांचा लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 08:44 PM2019-04-24T20:44:12+5:302019-04-24T22:32:56+5:30

महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास कारवाईला सुरुवात करताच नागरिकांनी दुकानदारांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावरून वाद निर्माण झाला. लोकांचा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात अमिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.

Tension in Hansbaug in Nagpur, Lathimar of police, and removal of encroachment | अतिक्रमण हटविण्यावरून नागपुरातील हसनबागमध्ये तणाव , पोलिसांचा लाठीमार

अतिक्रमण हटविण्यावरून नागपुरातील हसनबागमध्ये तणाव , पोलिसांचा लाठीमार

Next
ठळक मुद्दे७५ अतिक्रमणाचा सफाया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे बुधवारी हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास कारवाईला सुरुवात करताच नागरिकांनी दुकानदारांनी प्रचंड विरोध दर्शविला. यावरून वाद निर्माण झाला. लोकांचा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर प्रचंड पोलीस बंदोबस्तात अमिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. 


हसनबाग पोलीस चौकी ते हसनबाग चौक, हसनबाग कब्रस्तान चौक या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवर चिकन बिर्याणी सेंटर, चिकन व मटन विक्रेते, पानठेले, वेल्डींग, हॉटेल्स व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. दुकानासाठी उभारलेले शेड, ओटे, पथकाने जेसीबीच्या साहाय्याने हटविले. यात ७५ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. 

मागील आठ ते दहा वर्षापासून आम्ही व्यवसाय करीत आहेत. अतिक्रमण हटविण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अचानक कारवाई करण्याला दुकानदारांनी विरोध दर्शविला. यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने तणाव निवळला. पथकाने कोणत्याही स्वरुपाची सूचना न देता बांधकामावर जेसीबीचे पंजे मारण्याला सुरुवात केली. यामुळे टिनाचे, दुकानातील साहित्याचे नुकसान होत असल्याने कारवाईला विरोध दर्शविल्याची माहिती दुकानदारांनी दिली. हसनबाग प्रमाणे शहराच्या अन्य भागातही बाजारपेठेतील फूटपाथवर अतिक्रमण आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. यात भेदभाव केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. 

दरम्यान प्रवर्तन व बाजार विभागाच्या संयुक्त पथकाने संत्रा मार्केट रेल्वे फिडर रोड येथील मेट्रो रेल्वेच्या बांधकामात बाधा असलेली १८ दुकाने हटविली. यात राम आरसे, राधाबाई धामेचा, कवडु गोंडाणे, शेख शमशुदिन इसाक, देवीदास गुल्हाणे, वासीद अहमद खान, शेख नजीर शेख हुसैन, सैयद कमरअली, शेख उमरदराज व अब्दुल सत्तार, वत्सलाबाई मेश्राम, जगन्नाथ यादव, भयालाल पटेल, कांता सोमकु वर, रामप्यारी गौर, कमलाबाई पारडे, लक्ष्मण माटे, शेख सत्तार शेख मिया, अयुब खान याकूब आदींच्या दुकानांचा समावेश आहे.
अतिक्रमण कारवाई प्रवर्तन विभागाचे सहाय आयुक्त अशोक पाटील, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊ त, संजय कांबळे, बाजार विभागाचे अधीक्षक श्रीकांत वैद्य, बाजार निरीक्षक राजीव पवनकर आदींच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
सूचना न देता कारवाई चुकीची
मागील आठ ते दहा वर्षांपासून हसनबाग परिसरातील दुकानदार व्यवसाय करीत आहेत. अतिक्रमण करण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने पूर्वसूचना दिली असती तर दुकानदारांना टिन व साहित्य काढायला वेळ मिळाला असता. त्यांचे नुकसान झाले नसते. सूचना न देता अचानक कारवाई चुकीची आहे. दबावातून ही कारवाई करणे अयोग्य आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते महापालिका

पोलीस कॉन्स्टेबलला घेतला चावा
हसनबाग येथील अतिक्रमण हटविताना जीसीबीच्या समोर आलेल्या  भाजी विक्रेता मो. शकील याला बाजुला करताना त्याने बंदोबस्तावरील पोलीस कॉन्स्टेबल विलीत तांबडे यांना चावा घेतला. शकील याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणने व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Tension in Hansbaug in Nagpur, Lathimar of police, and removal of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.