मनोरुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घ्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:17 AM2018-06-02T01:17:09+5:302018-06-02T01:17:26+5:30

मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मनोरुग्णालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून धरणे दिले.

Take safai karmachari in service of Mental Hospital | मनोरुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घ्या 

मनोरुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घ्या 

googlenewsNext
ठळक मुद्दे काँग्रेसने केले आंदोलन : मुख्य द्वाराला ठोकले कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मनोरुग्णालयात ठेकेदारीवर काम करणाऱ्या ३६ सफाई कर्मचाऱ्यांना एकाएकी कामावरून कमी करण्यात आले. कुटुंबाचे पालनपोषण कसे करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला. याची दखल घेत पश्चिम नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी मनोरुग्णालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून धरणे दिले.
पश्चिम नागपूर शहर काँग्रेसचे ब्लाक अध्यक्ष प्रमोद सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी धरणे दिले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलकांना भेट दिली. यानंतर मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रवीण नवघरे यांचा घेराव करण्यात आला. संबंधित सफाई कर्मचारी गेल्या १० वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. ३१ मे रोजी प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे विकास ठाकरे यांनी डॉ. नवघरे यांना सांगितले. येथे नवी कर्मचारी भरती न करता या कर्मचाºयांनाच कामावर परत घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित कर्मचा ऱ्यांना कामावर घेण्यात आल्याच्या वर्क आॅर्डरची कॉपी दाखविण्याची मागणी केली असता ती मिळू शकली नाही. यावेळी कर्मचा ऱ्यांनी त्यांना किमान वेतनही मिळत नसल्याची तक्रार केली. संबंधित कर्मचा ऱ्यांना कामावर परत न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा ठाकूर यांनी दिला.
आंदोलनात राहुल करीहार, करिश्मा रासे, रूपेश रावत, क्रिष्णा मस्ते, मनीष दाभोडे, माधव जुगेल,स्वप्निल कोचे, आशिष रासे , प्रदीप मेंढे, अतुल सवाईथूल,करण बुलकुंदे, मलखान बुंदेलखंडी, अमरसिंह घवसेल, रोशनी बन्सोड, महेश्वरी दाभोडे, सिंधू चवरे, मंजू करोते, नंदा माटे, जुली कांबळे, निर्मला भोवते, शोभा मंडावी, वंदना फिलिप्स,सरिता बोंदले,हिरामणी पांडे, बिंदू सावरकर, वंदना टेभूर्णे, मीना सखारे, शालू शेन्द्रे, जयश्री जनबंधू आदींनी भाग घेतला.
डॉ. साधना तायडे आज घेणार आढावा
सहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे आज शनिवारी प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत रोजंदारी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरही चर्चा होणार आहे. काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले

Web Title: Take safai karmachari in service of Mental Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.