अभ्यासाच्या दडपणामुळे नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:59 AM2019-03-11T11:59:13+5:302019-03-11T11:59:43+5:30

अभ्यासाच्या दडपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने बजाजनगरात गळफास लावून आत्महत्या केली.

Student's suicide in Nagpur due to the pressure of study | अभ्यासाच्या दडपणामुळे नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

अभ्यासाच्या दडपणामुळे नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देआयआयटीची तयारी जड झाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभ्यासाच्या दडपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने बजाजनगरात गळफास लावून आत्महत्या केली. अंकित अरविंद आसुटकर (वय १७) असे मृताचे नाव आहे. तो भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील पांडव वॉर्डातील मुळ निवासी होता. १० वीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या अंकितने आयआयटीची तयारी करण्यासाठी नागपुरात शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यानुसार, त्याच्या पालकांनी अंकितला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत, येथील एका कोचिंग क्लासमध्ये आयआयटीचे क्लासही लावून दिले.
अंकित रामदासपेठेतील वानखेडे हॉलच्या मागे पराग वानखेडे यांच्या घरी किरायाच्या रूममध्ये राहत होता. अत्यंत मितभाषी असलेल्या अंकितला शनिवारी सायंकाळी त्याच्या आईने फोन केला. बराच वेळ संपर्क करूनही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या मित्रांकडे संपर्क करून विचारणा केली. त्याच्या वर्गमित्रांनीही अंकितबाबत काही माहिती दिली नसल्याने आईने त्यांना रुमवर बघण्यास सांगितले.
मित्रांनी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान रुमवर बघितले असता त्याने सिलींग फॅनला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावुन घेतल्याचे उघडकीस आले. मित्रांनी अंकितच्या आईवडिलांना आणि नंतर पोलिसांना ही माहिती कळविली.
पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या रुममध्ये एक चिठ्ठी आढळली. इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीतून अंकितने अभ्यासाच्या दडपणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.
विलास नारायण हजारे (रा. त्रिमूर्तीनगर) यांनी दिलेल्या माहितीवरून बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Student's suicide in Nagpur due to the pressure of study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.