थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:20 PM2019-03-15T22:20:08+5:302019-03-15T22:21:32+5:30

मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.

Struggle for drops Water ! Short Water storage in the reservoir | थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

Next
ठळक मुद्देनागपूर शहराला जूनपर्यंत ८२ दलघमी पाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प (कामठी खैरी) व तोतलाडोहाची एकूण क्षमता ११५७ द.ल.घ.मी आहे. सध्या कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. तर तोतलाडोह प्रकल्पात ७१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. अशी परिस्थिती असतानाही कामठी खैरी प्रकल्पातून जून अखेरपर्यंत ६१.२० द.ल.घ.मी. पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक या प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढते. मागणी व उपलब्ध जलसाठा याचा विचार करता मार्च ते ३० जून २०१९ दरम्यान नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातून ६१.२ द.ल.घ.मी. तर कन्हान नदीतून (पेंच कालव्यातून सोडण्यात येणारे)२०.८ द.ल.घ.मी. पाण्याची गरज भासणार आहे.
तूर्त जलसंकट नाही
शहराला जून महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई भासणार आही. सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.
मनोज गणवीर ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग

  • जलप्रदाय विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून (कामठी खैरी) १९५.४३. द.ल.घ.मी. कन्हान नदीतून ५३ द.ल.घ.मी., विहिरी व बोरवेलमधून १९.५२ तर गोरेवाडा जलाशयातूत ५.८४ द.ल.घ.मी. असे एकूण २७३.७९ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे.
  • पाणी कमी असलेल्या २०१८-१९ या वर्षात पेंच प्रकल्पातीत १५५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित आहे. वास्तविक १९५.४३द.ल.घ.मी. पाण्याची मागणी होती.
  • पेंच प्रकल्पातील आरक्षित कोट्यातील ११३.७१ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केली आहे. त्यामुळे उर्वरित ८२ द.ल.घ.मी. पाणी कसे मिळणार?

Web Title: Struggle for drops Water ! Short Water storage in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.