राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई :३७ ठिकाणी छापे, ३४ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 09:23 PM2019-05-16T21:23:34+5:302019-05-16T21:25:48+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या ३७ ठिकाणांवर छापे घातले. तेथून ३४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Strike action of state excise department: raids in 37 places, 34 accused arrested | राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई :३७ ठिकाणी छापे, ३४ आरोपींना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई :३७ ठिकाणी छापे, ३४ आरोपींना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या ३७ ठिकाणांवर छापे घातले. तेथून ३४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनाने यांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवून गंजीपेठ, संत्रा मार्केट, पाचपावली, कळमना, यशोधरानगर, हुडकेश्वर, कोराडी, पाटणसावंगी, सावनेर, एकाटोल, हिंगणा, कुही भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांकडे छापे मारले. त्याचप्रमाणे गिट्टीखदानमधील भिवसेनखोरी आणि रामटेक तालुक्यातील दाहोद येथील हातभट्टीची दारू गाळणाऱ्यांकडे एकाच वेळेस छापे टाकून १४,७५० लिटर सडवा, ४९९ लिटर दारू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ३ लाख ८३ हजार ६४९ रुपये आहे.
उपरोक्त ठिकाणी मयूर कळंबे, रवी शंकर, भारती गजानन दपतीवर, रोशन शेंदरे, सुमित्रा राजेश बोरकर, सांगीत उगलवार, सुरेंद्र मोहन निमजे, हरीश निमजे, हेमंत जगन, स्वप्निल कोहवे, विजय बघेल, मंजूर अहमद सुलतान, महादेव तळवदे, राजू शंकर धकाटे, पाहवारी कमकर, शारदा सिद्धार्थ ककिडे, राजकुमार वाघमारे, प्रमोद प्रभू रॉय, कैलास पोटे, मनीष काकडे, नामदेव सापतोडे, सुभाष उईके, प्रतिमा गोंडाणे, गुलाब नायने, लक्ष्मी कापसे, छाया कामटे, चंद्रकांत वासे, हरिप्रसाद मरसकोल्हे, जीवन देव्हारे, सुधाकर गेडाम, सुलोचना गेडाम, सुशील मेश्राम या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले.
या विशेष मोहिमेत भिवसेनखोरी येथील हातभट्टी दारू गिट्टीखदान पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलीस उपनिरीक्षक जोगी यांच्या मदतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपअधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर, निरीक्षक सुभाष हनवते, केशव चौधरी, दुय्यम निरीक्षक गणेश केंद्रे, उमेश शिरभाते, राहुल अंभोरे, नरेंद्र बोलधने, बापूसाहेब बोढारे, बाळू भगत, अनिल जुमडे, शैलेश अजमिरे, राजेंद्र बोलधने, मुरलीधर कोडापे, दत्तात्रय वरटी, मुकंद चिटमठवार, राजेंद्र मोहोड, राजेंद्र सोनोने, रावसाहेब कोरे आदींनी सहभाग घेतला.

 

Web Title: Strike action of state excise department: raids in 37 places, 34 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.