नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:11 AM2018-06-01T00:11:44+5:302018-06-01T00:12:01+5:30

गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.

Storm of Nagpur: Lightning electric pole fell, trees fell | नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

नागपुरात वादळाचा फटका : विजेचे खांब वाकले, झाडे पडली

Next
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत, बुटीबोरीत फीडरचे १५ वीज खांब कोसळलेजामठ्यातील दोन वीज मनोरे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने चांगलाच फटका बसला. शहर व जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. डझनभर वृक्ष कोसळून पडले. तासभर हैदोस घातल्यानंतर वादळ शांत झाले. परंतु तोपर्यंत जनजीवन विस्कळीत झाले होते. ढगांमुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत पारा ४३.२ डिग्री सेल्सिअसवर आला आहे. २४ तासात कमाल तापमान ३.१ डिग्री सेल्सिअसने खाली आले.
वातावरण अचानक बदलल्याने शहरात वीज वितरण यंत्रणा पूर्णत: प्रभावित झाली. मानकापूर येथून निघणाऱ्या ३३ केव्ही लाईनशी जुळलेले सर्व परिसर अंधारात बुडाले. विनोबा भावेनगर येथे विजेचे खांब वाकले. बिनाकी फीडरवर वृक्ष कोसळल्याने एचटी लाईनचा खांबही पूर्णत: खाली वाकला. दुसरीकडे ग्रामीण भागात महावितरणला मोठा फटका बसला. बुटीबोरी, हिंगणा, मौदा या ग्रामीण भागात वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज खांब अक्षरश: कोलमडून पडले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर वृक्ष कोलमडून पडल्याने ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या ठप्प झाल्या. परिणामी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला होता.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीला अनेक ठिकाणी फटका बसला. बुटीबोरी एमआयडीसी येथील महावितरणच्या उपकेंद्रातून निघणाऱ्या मोरारजी वाहिनीवरील १५ विजेचे खांब संध्याकाळी ५.३० च्या सुमारास आलेल्या वादळामुळे कोलमडून पडले. सोबतच हिंगणा-जामठा या वीज वाहिनीचे दोन मनोरे जमीनदोस्त झाल्याने या भागातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता.
मौदा शहरालादेखील वादळी पावसाचा फटका बसला. वादळी पावसामुळे मौदा शहरातील सुमारे पाच हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. कळमेश्वर येथील वीज पुरवठा काहीअंशी सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता घुगल यांनी सांगितले. दीक्षाभूमी येथे चित्रकला महाविद्यालयासमोर एक वृक्ष वादळी पावसामुळे कोसळून रस्त्याच्या मध्ये आले. त्यामुळे वाहतूक विस्कळत झाली होती. बराच वेळ वाहतूक विस्कळीत राहिली.

 

Web Title: Storm of Nagpur: Lightning electric pole fell, trees fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.