नागपूर हायकोर्टात बस्त्यांसाठी लागली विशेष लिफ्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:18 PM2019-06-24T21:18:46+5:302019-06-24T21:20:27+5:30

हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या विद्यमान कार्यकारिणीने अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा प्रेरणादायक कार्य केले आहे. न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता हायकोर्टात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्यामुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Special Lift for Bags in Nagpur High Court | नागपूर हायकोर्टात बस्त्यांसाठी लागली विशेष लिफ्ट

नागपूर हायकोर्टात बस्त्यांसाठी लागली विशेष लिफ्ट

Next
ठळक मुद्दे अवजड काम झाले सुकर : ‘एचसीबीए’चा बस्ता कर्मचाऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या विद्यमान कार्यकारिणीने अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा प्रेरणादायक कार्य केले आहे. न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता हायकोर्टात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्यामुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे हजारावर बस्ते रोज वकिलांच्या कारमधून खाली उतरविणे व पहिल्या माळ्यावरील संबंधित न्यायालयांमध्ये पोहोचवून देणे आणि न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर ते बस्ते परत खाली आणून वकिलांच्या कारमध्ये ठेवून देणे, या कामासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सपाट ठिकाणी चाकांच्या ट्रॉलीद्वारे फाईल्सचे बस्ते इकडून-तिकडे हलविले जातात. त्याचा बस्ता कर्मचाऱ्यांना त्रास होत नव्हता. त्यांचा खरा कस पायºयांच्या मार्गाने तळमाळ्यावरून पहिल्या माळ्यावर व पहिल्या माळ्यावरून तळमाळ्यावर बस्ते हलविताना लागत होता. या अवजड कामामुळे त्यांना कंबर, गुडघे, पाठ व मानदुखीचे आजार जडले होते. एक दिवस त्यांनी अ‍ॅड. किलोर यांना स्वत:ची कैफियत सांगितली. त्यानंतर अ‍ॅड. किलोर यांनी बस्ता कर्मचाऱ्यांचे रोज होणारे हाल पाहता बस्त्यांसाठी विशेष लिफ्ट लावण्याचा निर्णय घेतला. चांगली कामे करण्यासाठी नेहमीच तत्पर राहणाऱ्या संघटनेच्या कार्यकारिणीने तो निर्णय उचलून धरला. त्यानुसार, दक्षिणेकडील इमारतीमधील पहिल्या बार रुमपुढील पायऱ्याच्या ठिकाणी विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. येत्या गुरुवारी सकाळी १०.३० वाजता बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते या लिफ्टचे उद्घाटन केले जाणार आहे.
गरजेनुसार लिफ्ट बनवून घेतली
ही लिफ्ट गरजेनुसार बनवून घेण्यात आली आहे. मुंबईतील पॉवर लिफ्ट कंपनीला या लिफ्टचे काम देण्यात आले होते. तज्ज्ञांच्या चमूने संबंधित जागेचे निरीक्षण केल्यानंतर लिफ्टचे विशेष डिझाईन तयार केले. ही दोन सिलेंडरची हायड्रोलिक लिफ्ट आहे. बस्त्यांसाठी देशातील कोणत्याही न्यायालयात लिफ्ट नाही. अशी लिफ्ट बसविणारी एचसीबीए ही देशातील एकमेव संघटना आहे.
 अ‍ॅड. अनिल किलोर.

Web Title: Special Lift for Bags in Nagpur High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.