विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:00 PM2018-11-12T21:00:51+5:302018-11-12T21:04:24+5:30

केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

Special interview: Great dissent against BJP in the country: Suresh Mane | विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

विशेष मुलाखत : देशात भाजपाविरोधात प्रचंड असंतोष : सुरेश माने

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षाचे ऐक्य अत्यावश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपा-सेनेच्या सरकारने जनतेसाठी सकारात्मक ठरतील असे कोणतेच धोरणात्मक निर्णय घेतले नाही. विकासाची केवळ आश्वासने देणारे सरकार आता मंदिर व स्मारकांकडे वळले आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, लहानमोठे उद्योजक व नोकरीपेशा वर्ग असे सर्वच या सरकारला कंटाळले आहेत. हा असंतोष लक्षात घेऊन मतांची विभागणी टाळण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी अहंकार विसरून एकत्र येणे अत्यावश्यक आहे, असे मत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) चे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.
लोकमतशी विशेष बातचीत करताना त्यांनी निवडणुकांसह विविध विषयावर भाष्य केले. येत्या लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेता बीआरएसपीने राज्यभरात तयारी चालविली आहे. लोकांमध्ये भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुकांत भाजपाला फटका बसेल. अशावेळी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गैरभाजपा, गैरशिवसेना अशा सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी उभी राहणे गरजेचे आहे. आम्ही एकत्रीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. आघाडी झाल्यास राज्यात दोन लोकसभेच्या जागांची आमची मागणी आहे. मात्र आघाडी झाली नाही तर राज्यात लोकसभेच्या ४० व विधानसभेच्या २०० च्यावर जागा लढण्याची आमची तयारी आहे. त्याअंतर्गत नुकतेच विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र कोकण भागात अधिवेशनाचे आयोजन पक्षातर्फे करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेससह  राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड आदी पक्ष व संघटनांना आम्ही बोलाविले होते. ओबीसी, आदिवासी यांच्यासह लहानमोठ्या पक्ष, संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही एक पर्याय निश्चितच देऊ असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला. आंबेडकरी राजकारणाला आरक्षण, अ‍ॅट्रासिटी व स्कॉलरशीपच्या चौकटीत बांधण्यात आले आहे. मात्र आपल्याला शेतकरी, रोजगार याबाबत धोरणात्मक निर्णयाद्वारे आंबेडकरी राजकारणाची व्यापकता लोकांना दाखवून द्यायची असल्याचे त्यांनी सांगितले.

बसपाचे अस्तित्वच धोक्यात
बहुजन समाज पक्षाची देशात वाईट अवस्था आहे. मिशनचे कार्यकर्ते दूर गेले असून केवळ निवडणुकांपुरते राजकारण उरलेले आहे. विविध राज्यातील समीकरणे हाताळण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात बसपाचे अस्तित्व विदर्भापुरते मर्यादित होते, मात्र येथेही मतांची टक्केवारी कमी झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यात बीआरएसपीला बऱ्यापैकी यश आल्याचा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांनी भूमिकेचा पुनर्विचार करावा
महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या ऐक्याच्या प्रक्रियेत प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी सध्याच्या आडमुठ्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी सोयीचे समीकरण करू नये. संविधान बचावचा टाहो फोडण्यापेक्षा संविधानविरोधी पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यामध्ये भाजप-शिवसेनेच्या विजयाचे खापर बाळासाहेबांवरच फुटेल, असे मत डॉ. माने यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Special interview: Great dissent against BJP in the country: Suresh Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.