गुरूंच्या भेटीला दक्षिणेचा सुपरस्टार अंजनगावात; दरवर्षी येताे भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 01:37 PM2022-07-13T13:37:56+5:302022-07-13T13:43:51+5:30

दक्षिणचा हा ‘सुपरस्टार’ त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी मंगळवारी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे दाखल झाला आहे.

South superstar gopichand visit to Anjangaon to meet his Guru | गुरूंच्या भेटीला दक्षिणेचा सुपरस्टार अंजनगावात; दरवर्षी येताे भेटीला

गुरूंच्या भेटीला दक्षिणेचा सुपरस्टार अंजनगावात; दरवर्षी येताे भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्देब्रह्मकुमारीज सेंटरमध्ये कृतज्ञतेचा क्षण

निशांत वानखेडे

नागपूर : चित्रपट अभिनेत्यांची फॅन फाॅलाेइंग काेट्यवधीच्या घरात असते व त्यांची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. मात्र, काेट्यवधी फॅन असलेल्या अभिनेत्यांचाही कुणी आयडियल असताे, गुरू असताे. त्या गुरूंचे दर्शन, एक शब्द ऐकण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. दक्षिणचा असाच एक ‘सुपरस्टार’ त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी मंगळवारी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे दाखल झाला आहे.

हा सुपरस्टार म्हणजे तेलगू अभिनेता गाेपीचंद हाेय. दक्षिणेत आणि आता देशातही त्यांचे काेट्यवधी चाहते आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाला वलय आहे. या गाेपीचंद यांनी अंजनगाव सुर्जीच्या ब्रह्मकुमारीज सेंटरचे गजेंद्रभाई ठाकरे यांना गुरुस्थानी मानले आहे. काेट्यवधी फॅनचा हा सुपरस्टार कधीतरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात समस्यांनी ग्रस्त हाेता. कुणीतरी त्याला गजेंद्रभाई यांना भेटण्याचा सल्ला दिला. तेव्हा २०१६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अंजनगावला येऊन गजेंद्रभाईंची भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाने गाेपीचंद यांच्या आयुष्यात वेगळेच परिवर्तन घडले आणि त्यांनी गजेंद्रभाई यांना गुरूंचे स्थान दिले. तेव्हापासून आजतागायत दरवर्षी गुरुपाैर्णिमेला ते गुरूंच्या भेटीसाठी अंजनगावला येतात. त्यांच्या मते गुरूंच्या भेटीने, त्यांच्या मार्गदर्शनाने आयुष्यात अपेक्षित कामे झाली. आज ते कुठलेही काम गजेंद्रभाईंना विचारल्याशिवाय करीत नाही. अगदी त्यांच्या काेणत्याही चित्रपटाचे प्रदर्शनही गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच ठरवितात.

हे अभिनेता गाेपीचंद मंगळवारी हैदराबादहून नागपूर विमानतळावर पाेहोचले. यावेळी त्यांची पत्नीही साेबत हाेती. नागपूरचे विक्रम चाैधरी हे त्यांचे मित्र. तेच त्यांचे सारथ्य करीत असतात. नागपूरहून रस्ते मार्गे अंजनगावला पाेहोचले. येथे ब्रह्मकुमारीज सेंटरला जाऊन गुरू गजेंद्रभाई यांची भेट घेतली. विक्रम चाैधरी सांगतात, गाेपीचंद वर्षातून एकदा तरी येथे भेटीला येतात आणि माेबाईलवरही संपर्कात असतात. केवळ गाेपीचंद नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्यांचा मुलगा, माजी संरक्षण मंत्री व्ही. के. सिंह, अजय देवगन, काजाेल असे अनेक माेठे व्यक्ती गजेंद्रभाई यांचे चाहते आहेत. परिवर्तन घडल्यानेच गाेपीचंद शेकडाे किलाेमीटरचा प्रवास करून गुरूंच्या भेटीला विदर्भात पाेहोचले आहेत.

Web Title: South superstar gopichand visit to Anjangaon to meet his Guru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.