मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:55 AM2018-04-10T00:55:50+5:302018-04-10T01:05:12+5:30

दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

The solution will be for citizens of the Chief Minister's constituency | मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातील नागरिकांचे होणार समाधान

googlenewsNext
ठळक मुद्दे२८ व २९ रोजी  येथे समाधान शिबिर : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनअर्ज स्वीकारणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी हैद्राबाद हाऊस येथे आयोजित पत्रपरिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित असलेले प्रश्न थेट संबंधित विभागांकडून सोडविण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग या शिबिरात मिळत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरसेवकांना प्रत्येक वॉर्डातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न व प्रलंबित कामे समाधान शिबिराच्या माध्यमातून सोडविण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. हैद्र्राबाद हाऊस येथे विभागनिहाय अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. १८ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त झालेले अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात येऊन २५ एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जावर कारवाई होऊन २८ व २९ एप्रिल रोजी आयोजित समाधान शिबिरामध्ये प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आशा पठाण आदी उपस्थित होते.
या विभागांशी संबंधित तक्रारी अर्ज स्वीकारणार
समाधान शिबिरामध्ये नागपूर महानगरपालिका संबंधित सर्व विभागाशी असलेले अर्ज अथवा तक्रारी, नागपूर सुधार प्रन्यास, पुरवठा विभाग, अन्न सुरक्षा योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित शासकीय योजनांचा लाभ, संजय गांधी निराधार योजना, वीज वितरण कंपनी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळ (म्हाडा), प्रादेशिक परिवहन कार्यालय, समाज कल्याण, जिल्हा उद्योग केंद्र, कामगार मंडळ, सार्वजनिक आरोग्य, आदिवासी विभाग, पोलीस विभाग, मतदार नोंदणी, जिल्हा महिला व बाल विकास, जात पडताळणी समिती, जिल्हा अग्रणी बँक, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी विभागांमार्फत जनतेला उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवे संबंधात असलेल्या तक्रारींची सोडवणूक करण्यात येणार आहे.
आधार कार्डसाठी एक दिवस विशेष समाधान शिबिर दोन दिवसाचे असले तरी आधार कार्ड संबंधित कामांसाठी एक दिवस आणखी वाढवण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत हे शिबिर चालेल.
इतर विधानसभा मतदार संघातही होणार शिबिर
समाधान शिबिराचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभानिहाय समाधान शिबिर पार पडले. दुस ऱ्या  टप्प्यात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघापासून याची सुरुवात होत आहे. यानंतर इतर विधानसभा मतदार संघातही अशी शिबिरे घेतली जातील, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
१४ एप्रिल रोजी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन योजना पोहोचवणार
शासनाच्या मागासवर्गीयांसाठी विविध योजना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यात येतील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: The solution will be for citizens of the Chief Minister's constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.